लम्पी त्वचारोग प्रतिबंधक व उपाय: चर्चासत्राचे आयोजन| Prevention and Remedies of Lumpy Dermatitis: Conduct of Seminar

शिराळा ,ता.१३:पशुसंवर्धन विभाग सांगली जिल्हा परिषद, कृषी विज्ञान केंद्र तडसर व क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवार (ता. १४) सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता शिराळा तहसील कार्यालय येथे लम्पी त्वचारोग प्रतिबंधक व उपाय याविषयी चर्चासत्राचे आयोजन केले आहे. तरी या चर्चासत्रासाठी शिराळा तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंनी उपस्थित राहावे असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. एस के जाधव यांनी केले आहे.
लम्पी त्वचारोग प्रतिबंधक व उपाय: चर्चासत्राचे आयोजन| Prevention and Remedies of Lumpy Dermatitis: Conduct of Seminar
यावेळी डॉ. जाधव म्हणाले, या चर्चासत्रासाठी क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. विलास आहेर व कृषी विज्ञान केंद्र तडसरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल उलेमाले हे मार्गदर्शन करणार आहे . यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सदाशिव बेडक्याळे , गटविकास अधिकारी संतोष राऊत ,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग, नायब तहसीलदार ए. डी कोकाटे ,सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सचिन वंजारी, सहाय्यक गटविकास अधिकारी अरविंद माने,
लम्पी त्वचारोग प्रतिबंधक व उपाय: चर्चासत्राचे आयोजन| Prevention and Remedies of Lumpy Dermatitis: Conduct of Seminar
पशुधन विकास अधिकारी डॉ. संजय पवार, वारणा दुध संघाचे पशुसंवर्धन विभाग व्यवस्थापक डॉ. जयवंत पाटील, प्रचिती दूध संघाचे पशुसंवर्धन विभाग व्यवस्थापक डॉ. आर. पी. पाटील, विषय विशेषज्ञ (पशुविज्ञान) सोनाली पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे. तरी जास्ती जास्त शेतकऱ्यांनी या कार्यशाळेस उपस्थित रहावे असे आवाहन डॉ .जाधव यांनी केले आहे.

0 Comments