BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नाटोलीतील पॉलिशच्या बहाण्याने सोने चोरटा पोलिसांच्या जाळ्यात | Gold thief in police net on the pretext of polish in Natoli

शिराळा,ता.२३: नाटोली ( ता.शिराळा ) येथे सोन्याचे दागिने पॉलिश करून  महिलेचे चार तोळे दागिने  फसवून चोरून नेल्याप्रकरणी  संशयित आरोपी  दुर्गेशकुमार गुप्ता( वय २७ ,रा.महेश खुंट बझार , खगडीया बिहार ) यास संशयित रित्या फिरताना शिराळा पोलिसांनी अटक केली . त्यास  न्यायालयात हजर केले असता सोमवार (ता.२६)  पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. यातील  एक संशयित पळून गेला आहे.

नाटोलीतील  पॉलिशच्या बहाण्याने सोने चोरटा पोलिसांच्या जाळ्यात  | Gold thief in police net on the pretext of polish in Natoli 

    याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, घटना (ता.८) सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या दरम्यान घडली होती. यशोदा रामचंद्र पाटील ( वय ७५ ) या घरात एकट्याच होत्या. यावेळी एक अनोळखी इसम येऊन तुमच्या सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो असे सांगितले. यावेळी यशोदा  यांनी चार तोळ्याच्या पाटल्या पॉलिशसाठी दिल्या.  यावेळी संशयितांने प्यायला पाणी मागितल्याने  आणावयास गेल्या असता परत आल्यावर त्यांना  खऱ्या पाटल्या  ऐवजी खोट्या पाटल्या दिल्या. 

नाटोलीतील  पॉलिशच्या बहाण्याने सोने चोरटा पोलिसांच्या जाळ्यात  | Gold thief in police net on the pretext of polish in Natoli 

 यशोदा पाटील यांची मुलगी आल्यावर तिला पाटल्या दाखवल्या  असता त्या खोट्या असल्याचे कळाले .    पोलीस निरीक्षक सुरेश  चिल्लावार यांचे मार्गदर्शनाखाली सुभाष पाटील , माणिक पाटील , राजेंद्र माने , नितीन घोरपडे , युवराज जगदाळे , अमोल साठे, बी .आर. पाटील हे गस्त घालत असताना शिराळा येथील कापरी नाका बाह्य वळण रस्त्यावर संशयित आरोपी  दुर्गेशकुमार गुप्ता व त्याचा साथीदार फिरताना आढळून आले. त्या पैकी दुर्गेशकुमार सापडला .दुसरा संशयित पळून गेला. पुढील तपास हवालदार एम. आर. पाटील करीत आहेत.

नाटोलीतील  पॉलिशच्या बहाण्याने सोने चोरटा पोलिसांच्या जाळ्यात  | Gold thief in police net on the pretext of polish in Natoli 

Post a Comment

0 Comments