घरकुल लाभार्थी चर्चासत्र| Gharkul Beneficiary Seminar
घरकुल लाभार्थी चर्चासत्र| Gharkul Beneficiary Seminar
शिराळा ,ता.२२: प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना बांधकाम परवानगीसाठीचे प्रस्ताव ऑफलाईन पद्धतीने दाखल करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली असल्याचे प्रतिपादन शिराळा नगरपंचायतचे मुख्याधिकारी तथा प्रशासक योगेश पाटील यांनी केले.
शिराळा येथील विश्वासराव नाईक महाविद्यालयाच्या सभागृहात शिराळा नगरपंचायत मार्फत आयोजित घरकुल लाभार्थी चर्चासत्रात बोलत होते. यावेळी पाटील यांनी बांधकाम परवाण्यासाठी येणाऱ्या अडचणी, विविध टप्प्यात होणारे निधी वितरण व विलंब, बांधकाम मंजुर क्षेत्र नियमावली, जुना आराखडा मंजुरी व अभियंता निवडी बाबतची संदिग्धता याबात उपस्थिताना मार्गदर्शन केले. स्थापत्य अभियंता मुनीर लंगरदार यांनी या योजनेची माहिती, कामकाज पद्धती, निधीवितरण यांचा आढावा घेतला.
योजना सुरु झाल्यानंतर कमी वेळात सर्व सोयीनी युक्त घरकुल बांधणाऱ्या प्रथम १० लाभार्थ्यांचा शाल व पुष्प रोप देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बांधकाम अभियंता आनंद औताडे, पाणीपुरवठा अभियंता शरदचंद्र पाटील, लिपिक गणपती इंगवले उपस्थित होते.
0 Comments