आपले काम प्रामाणिक व सर्वोत्तम करा | Do your work honestly and to the best of your ability
आपले काम प्रामाणिक व सर्वोत्तम करा | Do your work honestly and to the best of your ability
शिराळा ,ता.२५: आपणाला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येकाने आपण करत असलेले काम प्रामाणिकपणे व सर्वोत्तम करा. जगात असणाऱ्या नोकरींच्या संधीचा शोध घ्या असे आवाहन भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड( hanmantravo gaikwad B .V.G.) यांनी केले.
आपले काम प्रामाणिक व सर्वोत्तम करा | Do your work honestly and to the best of your ability
शिराळा येथील साई संस्कृती हॉल मध्ये युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या वाढदिवसा निमित्त वीरा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित युवा उद्योजक शिबीर व नोकरी महोत्सव कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी गायकवाड म्हणाले,आपल्याजवळ असणाऱ्या मोबाईल तंत्रज्ञानाचा योग्य वापर करायला शिकले पाहिजे. त्या माध्यमातून दररोज येणारे नवनवीन बदल आत्मसात करायला शिकले पाहिजे. तुम्ही जे क्षेत्र निवडाल त्याचे परिपूर्ण ज्ञान आत्मसात करत त्यात सर्वोत्तम व्हाल त्याचवेळी तुम्ही यशस्वी व्हाल. शेती आधारित असणाऱ्या उद्योग धंद्यावर भर देण्याची गरज आहे. तळागाळातील प्रत्येक माणुस मोठा व्हायला पाहिजे याचा ध्यास घ्या. आपली प्रगती आपणच करावयाची आहे.
आपले काम प्रामाणिक व सर्वोत्तम करा | Do your work honestly and to the best of your ability
विराज नाईक म्हणाले, शिराळा तालुका हा डोंगरी तालुका आहे. त्यामुळे या तालुक्यातील तरुण रोजगारासाठी मुंबईकडे जाता आहे. असे तरुण आपल्या गावाकडेच स्वयंरोजगार निर्मितीतून उद्योजक बनले पाहिजेत यासाठी आम्ही हे युवा उद्योजक शिबीर घेत आहोत. प्रत्येकाने काळानुसार बदलून अर्थ व तंत्रज्ञानाची सांगड घातली पाहिजे.
आपले काम प्रामाणिक व सर्वोत्तम करा | Do your work honestly and to the best of your ability
वाढदिवसाच्या निमित्ताने वाळवा तालुक्याचे माजी सभापती रवींद्र बर्डे यांच्या हस्ते विराज नाईक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवीन "वीरा बिझनेस असोसिएशन"ची स्थापना करत असल्याचे विराज नाईक यांनी जाहीर केले. त्याच्या लोगोचे अनावरण गायकवाड व आमदार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हणमंतराव गायकवाड यांच्या हस्ते आरोग्य,शेती व उद्योग क्षेत्रात आपले वेगळेपण सिद्ध केलेल्या युवक ,युवतींंना पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.
आपले काम प्रामाणिक व सर्वोत्तम करा | Do your work honestly and to the best of your ability
विराज नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बी,व्ही,जी.ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांचा सत्कार आमदार मानसिंगराव नाईक व विराज नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास विश्वकर्मा पुणेचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील, आमदार मानसिंगराव नाईक ,सुनितादेवी नाईक, राजेंद्रसिंह नाईक, रणधीर नाईक, भूषण नाईक, देवेंद्र नाईक, बाळसाहेब पाटील, रवींद्र बर्डे, बाळासाहेब नायकवडी, रणजीत पाटील,शशिकांत पाटील, विश्वास कदम,सुश्मिता जाधव, डॉ. शिमोनी नाईक, शुभलक्ष्मी नाईक, आरती नाईक, काजल नाईक, सुनीता देशमाने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. नीता जोखे-आडके यांनी केले. आभार उदय पाटील यांनी मानले.
आपले काम प्रामाणिक व सर्वोत्तम करा | Do your work honestly and to the best of your ability
0 Comments