बिबट्याचा मृत्यू | Death of the leopard
बिबट्याचा मृत्यू | Death of the leopard
नेर्ले ( ता . वाळवा) येथे शुक्रवारी ( ता.२३ ) रात्री ११.३० ते १२.०० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र . ४ वर अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट ठार झाला.
बिबट्याचा मृत्यू | Death of the leopard
ही माहिती मिळताच वनअधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. पेठनाक्याहून नेर्लेकडे जाणा - या दिशेने जयहिंद धाब्यापासून अंदाजे २०० मी अंतरावर रस्त्याच्या डाव्या मादी बिबट्या बछडा रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक झालेने मृत झाल्याचे दिसून आला. त्याचे अंदाजे वय ६ ते ८ महिने आहे .त्याचे सर्व अवयव शाबुत आहेत.
बिबट्याचा मृत्यू | Death of the leopard
सदर मृत बिबटयास ताब्यात घेवून दत्त टेकड़ी इस्लामपूर येथे परिमंडळ वनअधिकारी कार्यालयात आज सकाळी आणून सहायक वनसंरक्षक अजित साजणे,वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांच्या समक्ष पशुवैदयकिय अधिकारी डॉ. माडकर शवविच्छेदन केले. प्राथमिक निष्कर्षानुसार बिबट्याचा मृत्यू हा वाहनाच्या धडकेमुळे गंभीर जखमी होवून अति रक्तस्रावामुळे झाले असलेचे आढळून आले आहे .त्यांतर दहन करण्यात आले. . या प्रकरणी वनगुन्हा नोंद करण्यात आला आहे .
0 Comments