या मार्गावर रस्त्याला भगदाड | A stampede on the road on this route
या मार्गावर रस्त्याला भगदाड | A stampede on the road on this route
शिराळा ,ता.१२ : शिराळा तालुक्यतील वाकुर्डे खुर्द ते अंत्री खुर्द दरम्यान असणाऱ्या मुख्य रस्त्याला मोठे भगदाड पडले असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. हा मार्ग मृत्यूचा सापळा बनल्याने संबंधित विभागाने याची तातडीने दाखल घेवून ते भगदाड दुरुस्त करावे अशी मागणी होत आहे.
या मार्गावर रस्त्याला भगदाड | A stampede on the road on this route
शिराळा तालुका हा अतीपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झालेली पहायला मिळत आहे. शिराळा तालुक्याच्या उत्तर भागातील वाकुर्डे खुर्द ते अंत्री खुर्द दरम्यान असणाऱ्या मुख्य रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. जवळपास पाच फुट खोल भगदाड पडले आहे. हे भगदाड रस्त्याच्या मध्यभागाच्या बाजूस पडल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना पटकन लक्षात येत नाही. दिवसेन दिवस हे भगदाड मोठे होत असल्याने धोकादायक बनू लागले आहे. या मार्गावरून अंत्री,वाकुर्डे खुर्द, सवादेकारवाडी,मादळगाव, जाधववाडी,झोळेवाडी , वाकुर्डे बुद्रुक या गावातील लोकांची सतत ये-जा सुरु असते.
या मार्गावर रस्त्याला भगदाड | A stampede on the road on this route
त्यामध्ये जनावरांचा पाय अथवा वाहनाचे चाक गेल्या मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दररोज ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना या धोक्याची माहिती असल्याने ते त्या ठिकाणहून सावध जात आहेत. मात्र नवीन येणाऱ्या व रात्रीचा प्रवास करणाऱ्या लोकांना व वाहन चालकांना याची माहिती नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. तरी संबंधित विभागाने याची त्वरित दाखल घेवून ते भगदाड दुरुस्त करावे अशी मागणी होत आहे.
या मार्गावर रस्त्याला भगदाड | A stampede on the road on this route
मी नेहमी या रस्त्यावरून सकाळी व्यायामासाठी जातो. सकाळी अंधुक वातावरण असल्याने रस्त्याच्याकडेला असणारे भगदाड नवीन येणाऱ्या लोकांना व वाहन धारक यांना कळत नाही. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून त्या भगदाड मध्ये लोकांना कळावे म्हणून झाडाची मोठी फांदी घातली आहे. पण ती ही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे संबंधित विभागाने हे भगदाड तातडीने दुरुस्त करावे अशी लोकांची मागणी आहे.संजय गुरव पादचारी अंत्री खुर्द .
0 Comments