BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा मॅरेथॉन | Shirala Marathon 2022

शिराळा मॅरेथॉन | Shirala Marathon 2022


शिराळा मॅरेथॉन | Shirala Marathon 2022


शिराळा मॅरेथॉन | Shirala Marathon 2022

शिराळा (प्रतिनिधी) येथील वीरा प्रतिष्ठानमार्फत व सांगली जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय "शिराळा मॅरेथॉन 2022" स्पर्धेचे 2 ऑक्टोबरला आयोजन केले आहे. सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने स्पर्धा होणार आहेत. ही माहिती वीरा प्रतिष्ठानने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. 

शिराळा मॅरेथॉन | Shirala Marathon 2022


शिराळा मॅरेथॉन | Shirala Marathon 2022

पत्रकात म्हटले की, स्पर्धा 10 व 5 किलोमीटर अशा दोन प्रकारात व खुला गट 21 वर्षांवरील अशा दोन गटात असेल. दोन्ही स्पर्धेमध्ये महिला व पुरुषांचा सहभाग असेल. दोन्ही गटात पुरुषांसाठी दहा, आठ, सहा हजार रुपये रोख, तर महिलांसाठी आठ, सहा, चार हजार रुपये रोख बक्षीसे आहेत. दोन्ही गटातील पुरुषांसाठी 4 ते 6 क्रमांकासाठी चार, दोन, एक हजार, 7, 8 व 9, 10 क्रमांसाठी आठशे व पाचशे रुपये बक्षीस. महिलांसाठी 4 व 5 क्रमांकासाठी दोन हजार व एक हजार, 6 व 7 क्रमांसाठी आठशे, 8 व 9 क्रमांकासाठी पाचशे व दहाव्या क्रमांसाठी तीनशे रुपयाचे बक्षीस असेल. प्रत्येक विजेत्यास व स्पर्धकास टि शर्ट, मेडल व प्रशस्तिपत्र देण्यात येईल. प्रवेश विनामुल्य व मर्यादित असेल. मुंबई येथील झुंबा नृत्य हे प्रमुख आकर्षण असेल. एज लिड टिव्ह, शिराळा व रत्नदीप मोटर्स, इस्लामपूर हे प्रायोजक आहेत. 

शिराळा मॅरेथॉन | Shirala Marathon 2022


शिराळा मॅरेथॉन | Shirala Marathon 2022

स्पर्धेचे नियम व अटी : स्पर्धा दि. 2 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 6:00 वाजता, तळीचा कोपरा, 32 शिराळा, याठीकाणाहुन सुरु होतील. सर्व खेळाडूंची नोंदणी व उपस्थीती सकाळी 5:30 वाजता, स्पर्धा स्थळी आवश्यक आहे. 21 वर्ष वयोगटातील मुले व मुली यांना जन्म तारखेचा दाखला आवश्यक, तसेच सर्व खेळाडूंनी नोंदणी वेळी आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.

शिराळा मॅरेथॉन | Shirala Marathon 2022


शिराळा मॅरेथॉन | Shirala Marathon 2022

 स्पर्धेचे क्षेत्र सांगली जिल्हा मर्यादित राहील. निवास व भोजन व्यवस्था केली जाणार नाही. स्पर्धा संपल्यानंतर सर्व स्पर्धकांना अल्पोपहार दिला जाईल. स्पर्धेदरम्यान खेळाडूंचे गैरवर्तन निदर्शनास आल्यास त्या खेळाडूस स्पर्धेतून बाद केले जाईल. स्पर्धेमध्ये सर्व सहभागी खेळाडूंनी स्वतःच्या जबाबदारीवर धावणेचे आहे. त्यास कोणत्याही प्रकारची इजा झाल्यास आयोजक जबाबदार रहाणार नाहीत. स्पर्धेचा बक्षीस समारंभ स्पर्धा संपल्यानंतर त्याच ठिकाणी घेतला जाईल. आयोजकांकडून फक्त प्रथमोपचाराची सोय केली जाईल. पंचांचे निर्णय अंतीम रहातील.

शिराळा मॅरेथॉन | Shirala Marathon 2022






Post a Comment

0 Comments