उस व इथेनॉलवर देश उभा राहील-माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे| The country will stand on sugarcane and ethanol-former state minister Ajitrao Ghorpade

शिराळा ,ता.२८:उसाचा धंदा हा आणखी दोन वर्षांनी अतिशय शाश्वत धंदा होणार आहे. इथेनॉलचा वापर असाच वाढत गेल्यास केवळ उस व इथेनॉलवर देश उभा राहील असे अर्थशास्त्र आल्याशिवाय राहणार नाही .त्यामुळे या सगळ्यांच्या मागे कारखाने आणि बँका सक्षमपणे उभ्या रहिल्या पाहिजेत असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी केले.
उस व इथेनॉलवर देश उभा राहील-माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे| The country will stand on sugarcane and ethanol-former state minister Ajitrao Ghorpade
शिराळा येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी घोरपेडे म्हणाले, बँकेने सहा टक्केची वन टाइम सेटलमेंट योजना राबविल्याने शेतकरी व सोसायट्या बाहेर निघतील व बँक वाचेल. बँक एन.पी.ए.च्या काठावर आली होती. या पुढील काळात बँक जपणे गरजेचे आहे.
उस व इथेनॉलवर देश उभा राहील-माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे| The country will stand on sugarcane and ethanol-former state minister Ajitrao Ghorpade
मानसिंगराव नाईक म्हणाले, शिराळ्यात बँकेची चांगली वस्तू उभी रहावी ही शेतकऱ्यांची मागणी होती. थकबाकीदार यांना बँकेने चांगल्या सुविधा दिल्या आहेत. बँक ८२ टक्के पीक कर्ज देते.त्याचा फायदा बँकेस होत नसला तरी हा तोटा शेतकऱ्यांच्यासाठी सहन केला जात आहे. या बँकेने शेतकरी हिताचे कायम निर्णय घेतले आहेत.
उस व इथेनॉलवर देश उभा राहील-माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे| The country will stand on sugarcane and ethanol-former state minister Ajitrao Ghorpade
यावेळी बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, संचालक अनिता सगरे, विशाल पाटील , बाळासाहेब होनमारे, मन्सूर खतीब, प्रकाश जमदाडे,सुरेश पाटील, चिमन डांगे, वैभव शिंदे, संग्रामसिंह देशमुख, राहुल महाडीक, महेंद्र लाड,तानाजी पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी एस.पी.वाघ, संपतराव देशमुख ,रणधीर नाईक, रणजितसिंह नाईक,विराज नाईक, भूषण नाईक,पृथ्वीसिंह नाईक, सहायक निबंधक डी.एस.खताळ, विजयराव नलवडे, बाळासाहेब नायकवडी, डी.जी.आत्तार, राजू निकम, बसवेश्वर शेटे, सुनील कवठेकर , अजय जाधव, विजय दळवी, विजय पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती. आभार सत्यजित देशमुख यांनी मानले.
उस व इथेनॉलवर देश उभा राहील-माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे| The country will stand on sugarcane and ethanol-former state minister Ajitrao Ghorpade
अजितरावांचा आवाज जास्त उपयोगी पडेल.
शेतकऱ्यांची व्यथा समजून घेणारा माणुस म्हणून मानसिंगराव नाईक अध्यक्ष झाल्याने आम्हाला मोठा आधार आहे. त्यामुळे मानसिंगराव तुम्ही कोणाच्या ही दबावाला बळी पडू नका.आम्ही तुमच्या पाठीशी आहे. हे मुद्दाम सांगतोय . बिधकपणे काळ्याला काळं आणि पांढऱ्याला पांढरं म्हणा. सर्व संचालक तुमच्या पाठीशी असतीलच पण हा अजितरावांचा आवाज तुम्हाला जास्त उपयोगी पडेल असे अजितराव घोरपडे यांनी ठणकावून सांगितले.
उस व इथेनॉलवर देश उभा राहील-माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे| The country will stand on sugarcane and ethanol-former state minister Ajitrao Ghorpade
शिराळकर आमचे अन्नदाता
कवठेमहांकाळ तालुक्याचा झालेला विकास हा शिराळच्या वाकुर्डे योजनेच्या पाण्यामुळे झाला आहे. या पाण्यामुळे बेडग ते ढालगाव पर्यंत ७० हजार एकर द्राक्ष बागायत झाहे, ही केवळ शिराळच्या पाण्यामुळे त्यामुळे शिराळकर हे आमचे अन्नदाता असल्याची जाहीर कबुली अजितराव घोरपेडे यांनी देवून शिराळ्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
उस व इथेनॉलवर देश उभा राहील-माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे| The country will stand on sugarcane and ethanol-former state minister Ajitrao Ghorpade
नाग वाघ संघर्ष संपुष्टात
शिराळा तालुका हा विकासच्या मुद्द्यावर एकसंघ आहेच पण आता वाघाचा( जयंतराव पाटील ) आणि नागाचा (शिवाजीराव नाईक ) संघर्ष संपुष्टात आला असल्याचे सत्यजित देशमुख म्हणताच सर्वत्र हश्या पिकला.
उस व इथेनॉलवर देश उभा राहील-माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे| The country will stand on sugarcane and ethanol-former state minister Ajitrao Ghorpade
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments