शिराळा नागपंचमी हाउसफुल | Shirala Nagpanchami Housefull
शिराळा नागपंचमी हाउसफुल | Shirala Nagpanchami Housefull
शिराळा नागपंचमी हाउसफुल | Shirala Nagpanchami Housefull
शिराळा नागपंचमी हाउसफुल | Shirala Nagpanchami Housefull
शिराळा,ता.२ :न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत शिराळा येथे घरोघरी नागप्रतिमेची पूजा करून शिराळकरांनी अमाप उत्साहात पण शांततेत आणि जोशपूर्ण वातावरणाता नागपंचमी साजरी केली. या नागपंचमीसाठी हजारो भाविकांनी गर्दी केल्याने मिरवणूक मार्ग व गल्ली बोळे गर्दीने खचाखच भरली होती.
शिराळा नागपंचमी हाउसफुल | Shirala Nagpanchami Housefull
यावर्षी पावसाने उघडीप दिल्याने व कोरोनाचाच्या दोन वर्षाच्या कालखंडा नंतर हजारो भाविकांनी अमाप गर्दी करून शिराळा नागपंचमीचा आनंद लुटला. सकाळी सहा वाजले पासून नागमंडळे प्रतिकात्मक नाग घेऊन अंबामाता मंदिरात पूजेसाठी जात होते. महिलांनी ही अंबामातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. अधून मधून पडणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर झेलत तरुणाईने वाद्याच्या तालावर बेधुंद ठेका धरला.
शिराळा नागपंचमी हाउसफुल | Shirala Nagpanchami Housefull
शिराळा आगाराच्यावतीने ५० गाड्यांची सोय केली होती. कायदा आणि सुव्यवस्थ राखण्यासाठी सहाशेहून अधिक पोलीस कर्मचार्यांचा व १२५ वन कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी वाळवा उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, तहसिलदार गणेश शिंदे, उपवनसंरक्षक निता कट्टे, सहायक वनसंरक्षक डॉ अजित साजणे, वनक्षेत्रपाल सचिन जाधव ,पोलीस निरिक्षक सुरेश चिल्लावार, सह्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, शिराळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी भेट देवून या मिरवणूक मार्गावर लक्ष ठेवले.,
शिराळा नागपंचमी हाउसफुल | Shirala Nagpanchami Housefull
सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास प्रणव पांडुरंग महाजन व त्यानंतर रामचंद्र महाजन यांच्या घरात नागप्रतिमा व मानाच्या पालखीचे विधिवत पूजन करून पालखी काढण्यात आली. त्यानंतर एक वाजता पालखीच्या मिरवणूकीला प्रारंभ झाला. मिरवणूक महाजन गल्ली गुरूवार पेठ, कुरणे गल्ली, सोमवार पेठ आबांमाता रोड आंबामाता मंदिरात नेण्यात आली. उपजिल्हा रुग्णालय येथे शिराळा नगरपंचायतने नियंत्रण कक्ष उभारला होता.
शिराळा नागपंचमी हाउसफुल | Shirala Nagpanchami Housefull
नागपंचमी उत्सवास आमदार मानसिंगराव नाईक, सुनितादेवी नाईक ,माजी आमदार शिवाजीराव नाईक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, माजी .जि.प.सदस्य सम्राट महाडीक, रणजितसिंह नाईक, माजी नगरसेवक केदार नलवडे, संजय हिरवडेकर,उत्तम डांगे, वैभव गायकवाड, कीर्तीकुमार पाटील, देवेंद्र पाटील, अजय जाधव,कुलदीप निकम, बसवेश्वर शेटे, राजू निकम, संतोष इंगवले, अवधूत इंगवले, अशोकराव गायकवाड, हारूण शेख, देवेश कांबळे, वसंत कांबळे, प्रमोद नाईक, सुनील कवठेकर , प्रा.सम्राट शिंदे, विश्वास कदम, राहुल गायकवाड, विनोद घाडगे, यांनी भेट दिली.
शिराळा नागपंचमी हाउसफुल | Shirala Nagpanchami Housefull
८०० जणांना मोफत चहा व नाष्टा
शिराळा तालुका कामगार परिषदेच्यावतीने बंदोबस्त करणाऱ्या पोलीस, वनकर्मचारी व विद्युत वितरण आणि स्वच्छता कामगार अशा ८०० जणांना शिराळा तालुका कामगार परिषदेच्यावतीने अध्यक्ष मारुती रोकडे यांनी बंदोबस्ताच्या ठिकाणी जाऊन मोफत चहा व नाष्टा वाटप केला.
शिराळा नागपंचमी हाउसफुल | Shirala Nagpanchami Housefull
जाहिरात
२१ भाज्यांचा नैवेद्य
येथील कोतवाल कुटुंबीयांनी चवळी,मेथी, शेपू, तांबडा,भोपळा,भोपळीची भाजी , राजगिगिरा, शेवगा, वांगी, दोडका, भेंडी, गवारी, श्रावण घेवडा, वाटणा ,वरणा, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, मुळा, आळूवाडी, बिन,लोणचे, अशा २१ भाज्यांचा नैवेद्य प्रतीकात्मक नागाला दाखवून महिलांनी नागाचा उपवास सोडला.
शिराळा नागपंचमी हाउसफुल | Shirala Nagpanchami Housefull
एक नजर
शिराळा शहरातील सर्व रस्ते व मिरवणूक मार्ग हाउफुल.
१५ रुग्णवाहिकांची सोय .
आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात युवा नेत्यांच्या स्वागत कमानी व बॅनरची रेलचल
वाढत्या गर्दीमुळे यात्रेसाठी आलेल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा ही गल्ला झाला हाउस फुल.
आगामी निवडणुकीमुळे मंडळा मंडळात वाद्य व पोस्टर उंचीबाबत स्पर्धा दिसत होती.
शिराळा आगाराच्या गाड्या ही प्रवाशांनी हाउसफुल
पोलीस ५०० , वनकर्मचारी १२५ ,३० सी.सी.टी.व्ही व १६ व्हीडिओ कॅमेरे,१२ ध्वनीमापक यंत्रे,१० गस्ती पथके ७ तपासणी नाके ,शिराळच्या ३२ गल्ल्यांमध्ये पथकांचे लक्ष ,४४ वाहतूक शाखेतील कर्मचारी तर ३३० पुरूष तर ६० महिला अंमलदार
शिराळा नागपंचमी हाउसफुल | Shirala Nagpanchami Housefull
0 Comments