BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

धार्मिकता जोपासणारी नागपंचमी | Nagpanchami which cultivates righteousness

धार्मिकता जोपासणारी नागपंचमी  | Nagpanchami which cultivates righteousness

 



धार्मिकता जोपासणारी नागपंचमी  | Nagpanchami which cultivates righteousness

नागपंचमी विशेष 

   

शिराळा,ता.१ : जिवंत नाग पूजेमुळे जग प्रसिद्ध झालेल्या शिराळच्या नागपंचमीवर सन २००२ पासून न्यायालयाची बंधने आली असली तरी कायद्याचे उल्लंघन न करता ती शिराळकर अत्यंत उत्साहात साजरी करून आपली धार्मिकता जोपासण्याचा प्रयत्न करत आहेत. दिवसेंदिवस ती साजरी करण्याच्या पद्धतीत बदल घडत असला तरी तरुणाईमध्ये नागपंचमीचा उत्साह कायम टिकून आहे. अवघ्या शिराळकरांच्या मनात जोश निर्माण करणारी नागपंचमी आज मंगळवारी (ता.२ )साजरी होत असून त्या निमित्त......

 

धार्मिकता जोपासणारी नागपंचमी  | Nagpanchami which cultivates righteousness


बाराव्या शतकात महायोगी गोरक्षनाथ महाराज लोकांचे प्रबोधन करत शिराळ्यात आले होते. श्रावण शुद्ध पंचमी दिवशी भिक्षा मागण्यासाठी ते महाजनांच्या घरी गेले. त्यावेळी एक गृहिणी मातीच्या नागाची पूजा करत होती. भिक्षा द्यायला वेळ का झाला या गोरक्षनाथांच्या प्रश्नावर तीने नाग पूजेचे कारण सांगितले. त्यावेळी मातीच्या नागाची कशाला जिवंत नागाची पूजा करणार का?असे विचारताच तीने होकार दिला.तेंव्हा पासून शिराळ्यात जिवंत नागाची पूजा सुरु झाली होती. येथील भगिनी नागाला आपला भाऊ मानतात. त्याचा उपवास धरतात. तो सूक्ष्म रुपाने घरात येईल, त्यास कोणत्याही प्रकारची इजा होऊनये म्हणून नागपंचमी दिवशी स्वयंपाकात चिरणे,तळणे वर्ज्य केले जाते.

 

धार्मिकता जोपासणारी नागपंचमी  | Nagpanchami which cultivates righteousness


२००२ पूर्वी प्रथम नागांची अंबामाता मंदिरात नंतर घरोघरी पूजा करून ट्रॅक्टर वरून मिरवणूक काढली जात होती. आत्ता न्यायालयाने बंधने घातल्याने जिवंत नागा ऐवजी नाग प्रतिमेची पूजा करून मिरवणूक काढली जात आहे.

धार्मिकता जोपासणारी नागपंचमी  | Nagpanchami which cultivates righteousness


६५ वर्षपूर्वी नागपंचमी अंबामाता मंदिर बाहेरील मोठ्या वडाच्या झाडाखाली भरत होती. बैल गाडीतून नागाची मिरवणूक काढत होते. वाहनांची सोया नसल्याने कमी लोक येत होते. १९५३ साली कै.दत्ताजीराव पोटे व इतर सहकाऱ्यांनी किर्लोस्करांना बोलावले. त्यावेळी स्वतः मुकुंदराव किर्लोस्कर, लेखक धो. म. मोहिते व छायाचित्रकार आले होते. १९५३ साली नागपंचमी कशी साजरी केली जाते याची माहिती १९५४ च्या किर्लोस्कर मासिकात प्रसिद्ध केली. त्याची चित्रफीत अमेरिकेत दाखवली. त्यानंतर नॅशनल जिऑग्राफीने शिराळ्यात येऊन पुन्हा प्रसिद्धी दिली. त्यानंतर या नागपंचमीचा जगभर लौकिक वाढला.

 

धार्मिकता जोपासणारी नागपंचमी  | Nagpanchami which cultivates righteousness


२१ भाज्यांचा नैवेद्य

येथील कोतवाल कुटुंबीय चवळी,मेथी, शेपू, तांबडा,भोपळा,भोपळीची भाजी , राजगिगिरा, शेवगा, वांगी, दोडका, भेंडी, गवारी, श्रावण घेवडा, वाटणा ,वरणा, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, मुळा, आळूवाडी, बिन,लोणचे, अशा २१ भाज्यांचा नैवेद्य नागाला  दाखवतात.

धार्मिकता जोपासणारी नागपंचमी  | Nagpanchami which cultivates righteousness

 

म्हणून आज ही होते तुळईची पूजा 

कोतवाल कुटुंबातील महिला सकाळी सहा वाजता वारूळ पूजा करून नंतर अंबाबाईच्या पूजेला जातात. त्यांतर घरी आल्यावर नागाच्या तुळईची  पूजा करतात. रामचंद्र व तुकाराम कोतवाल यांच्या घरात  एक  वर्षी कुठेच नाग सापडला नाही. त्यावेळी नैवेद्य तयार होता पण नाग नसल्याने  नैवद्य कोणाला दाखवायचा या  विवंचनेत कुटुंब असताना अचानक तुळईवर नाग आला. त्या ठिकाणी नागाची पूजा करून नैवेद्य दाखवण्यात आला. अशी आख्यायिका आहे. त्यावेळे पासून त्या नागाची तुळईची पूजा केली जात आहे. येथील मातीच्या  मनाच्या  नागाची  पूजा केल्या शिवाय महिला उपवास सोडत नाहीत.

 

कोतवालांचा नागाचा मान

येथील कोतवाल कुटुंबीय नाग नागपंचमी दिवशी सकाळी सात वाजता मातीचा नाग आंबामाता मंदिरात  पूजनासाठी घेऊन जात. त्यानंतर इतर लोक पूजा करता. पालखी समवेत नाग घेऊन जाण्याचा संदीप कोतवाल,सागर कोतवाल, मनोज कोतवाल,विशाल कोतवाल,सचिन कोतवाल,भिवा कोतवाल, अतुल कोतवाल, बाळू कोतवाल,महादेव कोतवाल, विजय कोतवाल,दाजी कोतवाल, यांचा मान असतो.भोई समाजाकडे पालखीचा मान आहे.

धार्मिकता जोपासणारी नागपंचमी  | Nagpanchami which cultivates righteousness

 

एक नजर 

 पोलीस ५००  

 वनकर्मचारी   १२५ 

 ३० सी.सी.टी.व्ही व  १६ व्हीडिओ कॅमेरे,

 १२  ध्वनीमापक यंत्रे

१०  गस्ती पथके

७  तपासणी नाके 

शिराळच्या  ३२  गल्ल्यांमध्ये पथकांचे लक्ष 

आरोग्य विभागाचेतज्ज्ञ डॉक्टरांचे पथक 

 ४४  वाहतूक शाखेतील कर्मचारी तर ३३०  पुरूष  तर ६०  महिला अंमलदार 

 दुपारी १ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत एकेरी वाहतूक 

 पेठनाका येथून सर्व वाहने एकेरी मार्गाने शिराळ्याकडे जातील. 

शिराळ्याकडून राष्ट्रीय महामार्ग ४ कडे जाणारी सर्व वाहने शिराळा बायपासमार्गे कापरी-कार्वे-ढगेवाडी फाटा-ऐतवडे बुद्रुक फाटा- लाडेगाव- वशी- येडेनिपाणी फाटा या मार्गाने महामार्ग क्र. ४ कडे जातील.

धार्मिकता जोपासणारी नागपंचमी  | Nagpanchami which cultivates righteousness




गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================





Post a Comment

0 Comments