BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

उत्तरप्रदेशची टोळी गजाआड | Gajaad tribe of Uttar Pradesh


उत्तरप्रदेशची टोळी गजाआड | Gajaad tribe of Uttar प्रदेश



उत्तरप्रदेशची टोळी गजाआड | Gajaad tribe of Uttar Pradesh

 

उत्तरप्रदेशची टोळी गजाआड | Gajaad tribe of Uttar Pradesh


उत्तरप्रदेशची टोळी गजाआड | Gajaad tribe of Uttar Pradesh

 शिराळा :करमाळे (ता. शिराळा ) येथील इंडस टाॅवर कंपनीच्या महागड्या ३६ बॅटरी सेल व बिऊर येथील  विद्युत मोटरच्या चोरी प्रकरणी शिराळा पोलिसांनी उत्तरप्रदेश व ओरिसा येथील अंतरराज्य  ७ जणांच्या  टोळीला शिराळा पोलिसांनी अटक केली आहे.  त्यांच्या कडून  ३६ बॅटरी सेल  , विद्युत मोटार ,चार चाकी गाडी,मोबाईल व चोरीसाठी वापरलेले हत्यार असा ८लाख ८२ हजार ५९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  त्यांना न्यायालयात हजर केले असता १९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.



 या चोरी प्रकरणी दयाशंकर नंदकुमार निषाद (वय ३८)  रा.रेंगणा, व  रामसरण रामआचरे (वय३१) रा. रेंगणा मजरे चांदपुर, दोघे सध्या रा.शिराळा, रामनारायण सुखलाल निषाद( वय  ३९)  रा.कोरवल धौरहरा, विश्वंबर रामलखन निषाद ( वय२९) रा.गजईपुर  बारा, हुकुमचंद श्रीरामदीन निषाद रा. रेंगणा  सर्व ता. बिंदकी जि. फतेहपुर,  देसराज जियालाल निषाद( वय ४५)  रा.महाता ता.  बागुआ, जि. फतेहपुर‌,  सर्व उत्तरप्रदेश,  संतोष ऊर्फ कमलकांत निरंजन नायर (वय ३७)  रा.बिरजपूर ता. गुबूडा जि. गोंजाम, राज्य ओरीसा सर्वांचा व्यवसाय भंगार खरेदी विक्री यांना शिराळा पोलिसांनी अटक केली आहे. 

उत्तरप्रदेशची टोळी गजाआड | Gajaad tribe of Uttar Pradesh

 

  याबाबत अमोल शामराव माळी (वय३५) रेडीयन्ट फॅसिलिटीज प्रो.लि.पुणे रा.भडकंबे (ता. वाळवा) यांनी इंडस टाॅवरच्या  ३६ बॅटरी सेल व  बिऊर येथील संजय बाळकू पाटील यांनी  विद्युत मोटर चोरी केल्याप्रकरणी अज्ञातावर शिराळा पोलिसात १६ जुलैला  गुन्हा दाखल केला होता. याचा तपास पोलिस हवालदार राजेंद्र माने यांच्याकडे होता. त्यानुसार शनिवारी (ता. १६) रोजी रात्री  शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस पथक बिऊर गावच्या हद्दीत गस्त घालत असताना उतर प्रदेश पासिंग असलेली महींद्रा एक्स यु व्ही क्रमांक युपी १६ ए.के ६८५६ हि गाडी पंक्चर अवस्थेत उभी असल्याची आढळून आली. त्यांच्याकडे चौकशी केली असता   उडवाउडवीची उत्तरे देवू लागले. त्यावेळी गाडी तपासली असता गाडीत बॅटरी सेल  व चोरी साठी वापरण्यात येणारी  हत्यारे आढळून आली.

  यावेळी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी करमाळे येथील मोबाईल टाॅवरच्या  ३६ बॅटरी सेल व  बिऊर येथील विद्युत मोटर चोरीची कबुली दिली. त्यांच्या कडून २,४६,१४४ रुपये किंमतीच्या मोबाईल टाॅवर बॅटरी सेल, ६ लाख रुपये किंमतीची चार चाकी गाडी, २४५० रुपये किंमतीची चोरी करता वापरलेली हत्यारे, १४००० किमतीचे मोबाईल, व २० हजार रुपये किंमतीची पाण्यातील विद्युत मोटर असा एकूण ८,८४,५४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  पुढील तपास पोलिस हवालदार राजेंद्र माने करत आहे.

उत्तरप्रदेशची टोळी गजाआड | Gajaad tribe of Uttar Pradesh

 
ही कारवाई पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम, अपर पोलीस अधिक्षक मनिषा डुबूले, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस उफनिरीक्षक शिवाजी पाटील, पोलीस हवालदार महेश साळुंखे, राजेंद्र माने, दिपक खोमणे, पोलीस नाईक अमर जाधव, नितीन यादव, माणिक पाटील, शरद यादव या पथकाने  कारवाई केली. 

उत्तरप्रदेशची टोळी गजाआड | Gajaad tribe of Uttar Pradesh

                                        मुक्काम शिराळ्यात 

यातील दोन चोरटे हे शिराळा येथे  भंगार व्यवसायाच्या निमित्ताने मुक्कामास आहेत.  उत्तर प्रदेशचे त्यांचे सहकारी येथे  मुक्क्मास येवून चोरी करत असल्याचे उघड झाले आहे. कारण येथे मुक्कामास असणारे चोरटे पाळत ठेवून मग आपल्या सहकाऱ्या समवेत डल्ला मारत असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे त्यांच्या कडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.आष्टा येथे ही मोबाईल  टाॅवरच्या बॅटरी सेलची चोरी झाली आहे. त्याचा ही छडा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे मोठे रॅकेट असावे .

उत्तरप्रदेशची टोळी गजाआड | Gajaad tribe of Uttar Pradesh

 

तो अंदाज खरा ठरला 

दोन दिवसा पूर्वी वाळवा येथे झालेल्या चोरी वरून पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी आपल्या सर्व सहकार्यांना वाळव्यात चोरी झाल्याने चोरटे भाग बदलणार त्यामुळे रात्रीच्या गस्ती बद्दल सतर्क राहण्याचे आदेश दिले. त्यानुसार गस्त घालत असताना या चोरट्याचे  हाती लागल्याने चिल्लावार यांचा अंदाज खरा ठरला.

उत्तरप्रदेशची टोळी गजाआड | Gajaad tribe of Uttar Pradesh

 

एक महिन्यात  दुसरी अंतरराज्य टोळी गजाआड

जून महिन्यात शिराळा येथील नलवडे कॉलनीतील घरफोडी प्रकरणी शिराळा पोलिसांनी आंतरराज्य घरफोड्या करणाऱ्या तिघांना  मध्यप्रदेश  येथील टाण्डा  तालुक्यातील  कुक्षी येथून  ताब्यात घेवून दोन लाख २२ हजार ४५० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला होता. आता उत्तरप्रदेशची टोळी गजाआड केली आहे. 

उत्तरप्रदेशची टोळी गजाआड | Gajaad tribe of Uttar Pradesh


गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================





Post a Comment

0 Comments