BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

डफळेवाडीत रस्त्याला भेग | Cross the road at Dafflewadi

 शिराळा,ता.११: डफळेवाडी (ता. शिराळा)  येथील डफळेवाडी ते पणुंब्रे वारुण  दरम्यान नवीन केलेल्या  रस्त्याला  पावसाच्या संततधारेमुळे मोठी भेग पडली असून रस्ता खचण्याची शक्यता  असल्याने  या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे .

डफळेवाडीत रस्त्याला भेग | Cross the road at Dafflewadi

शिराळा तालुक्यात गेले आठ  पावसाचा जोर कायम असून आज दिवसभर पावसाची संततधार कायम आहे. जोरदार पडणाऱ्या पावसामुळे  डफळेवाडी ते पणुंब्रे दरम्यान नवीन केलेला रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेग पडली  आहे . सव्वाशे ते दीडशे कुटुंब असणारी  डफळेवाडी  ही वाकईवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येत आहे.  याच रस्त्याच्या वरील बाजूस गेल्या वर्षी काही प्रमाणात डोंगर खचला आहे. त्यामुळे या वाडीचे नाव संभाव्य भूस्खलनचा धोका असलेल्या  यादीत आले  आहे.

डफळेवाडीत रस्त्याला भेग | Cross the road at Dafflewadi

 या लोकांना अद्याप  भूस्खलनचा म्हणावा तेवढा धोका नसल्याने त्यांचे अद्याप स्थलांतर करण्यात आले नाही. मात्र या  रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेग पडल्याने पावसाळ्यात आणखी मोठ्या प्रमाणात रस्ता खचण्याची शक्यता आहे.  त्यामुळे त्याची  त्वरित दुरुस्ती होणे गरजेचे  आहे.

डफळेवाडीत रस्त्याला भेग | Cross the road at Dafflewadi

शिराळा पश्चिम भागात दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत आहे. या संततधार पडणाऱ्या पावसामुळे नवीन केलेल्या रस्त्याला  भेग पडून खचू लागला आहे. आणखी पाऊस असाच सुरु राहिल्यास  प्रमाणात रस्ता खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी . रघुनाथ डफळे (ग्रामस्थ डफळेवाडी ) 

डफळेवाडीत रस्त्याला भेग | Cross the road at Dafflewadi

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments