विश्वास कारखान्याचा दुसरा हप्ता दोनशे रुपये |The second installment of Vishwas factory is two hundred rupees

शिराळा : विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यातर्फे गळीत हंगाम २०२१-२२ साठी गाळप ऊसापोटी प्रतिटन २०० रुपयांचा दुसरा हप्ता गुरुवार (ता. ९) पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
विश्वास कारखान्याचा दुसरा हप्ता दोनशे रुपये |The second installment of Vishwas factory is two hundred rupees
ते म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीतून सहकारी साखर कारखानदारी वाटचाल करत आहे. तरीही सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास व कामगारांच्या ताकदीवर कारखान्याने दमदार वाटचाल केली आहे. विविध उपपदार्थ निर्मिती प्रकल्पाचा फायदा शेतकऱ्यांना ऊस दराच्या रुपाने होत आहे. २०२१-२२ च्या गळीत हंगामात ५ लाख ८२ हजार २८२ मेट्रीक टन ऊसाचे गाळप झाले. त्यातून ६ लाख ५७ हजार ५०० क्विंटल साखर पोती ऊत्पादन झाले. कारखान्याची २०२१-२२ च्या गळीत हंगामाततील आधारभूत किंमत २ हजार ९७२ रुपये आहे. पहिल्या हप्त्यापोटी २ हजार ६०० रुपये ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना कारखान्याने अदा केले आहेत.
विश्वास कारखान्याचा दुसरा हप्ता दोनशे रुपये |The second installment of Vishwas factory is two hundred rupees
सध्या खरीप हंगामातील व ऊसशेती मशागतीची कामे सुरु आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्याकडून खते व इतर आवश्यक कामासाठी दुसऱ्या हप्त्याची मागणी सातत्याने होत होती. या मागणीचा विचार करून संचालक मंडळाने दुसरा हप्ता २०० रू. प्रमाणे देण्याचा निर्णय घेतला आहे. हप्त्याची एकूण रक्कम ११ कोटी ६५ लाख ७६ हजार ४०० रुपये शेतकऱ्यांचा बँक खात्यावर गुरुवार (ता. ९) पर्यंत जमा होईल.
विश्वास कारखान्याचा दुसरा हप्ता दोनशे रुपये |The second installment of Vishwas factory is two hundred rupees
आमदार नाईक म्हणाले, अडचणीतून वाटचाल करणारी सहकारी साखर कारखानदारी वाचवायची असेल तर, जशी ऊसाला आधारभूत किंमत निश्चित केली आहे, त्याप्रमाणे साखरेलाही अधारभूत किंमत निश्चित करावी. सध्या देशातील बाजारपेठेत साखरेला म्हणावा तसा उठाव नाही. केंद्र सरकारचे निर्यात धोरण कचखाऊ आहे. सध्या निर्यात होणाऱ्या साखरेला चांगला दर येत असताना केंद्राने निर्यात बंदी केली आहे. यामुळे पुन्हा कारखानदारी पुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. साखरेला किमान ३४०० ते ३५०० भाव मिळाल्या शिवाय कारखान्यांना ऊसाची अधारभूत किंमती देण्यास अडचणी येणार आहेत.
विश्वास कारखान्याचा दुसरा हप्ता दोनशे रुपये |The second installment of Vishwas factory is two hundred rupees
ते म्हणाले, विश्वासराव नाईक कारखान्याचे कार्यक्षेत्र शिराळा व शाहूवाडी तालुका डोगराळ व दुर्गम आहे. तरीही येथील शेतकरी कष्टाने ऊस पिकवत आहे. तो आणण्यासाठी तोडणी व वाहतूक खर्च जादा होत आहे. कारखान्यामार्फत पाणी योजना राबवून शेतीसाठी पाणी उपलबद्ध करून दिले आहे. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सातत्याने ‘विश्वास’ उद्योग समुहावर प्रेम केले आहे. म्हणून "विश्वास"ची पाळेमुळे घट व खोलवर रुजली आहेत.
झालेल्या प्रगतीत सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचार्यांचे मोठे योगदान आहे. माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की, त्यांनी पिकवलेला सर्व ऊस कारखान्याकडे नोंद करावा. यावेळी कारखाण्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
विश्वास कारखान्याचा दुसरा हप्ता दोनशे रुपये |The second installment of Vishwas factory is two hundred rupees
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments