अस्वलवाडी येथे २५ वर्षीय युवकाची आत्महत्या | Youth commits suicide at Aswalwadi
अस्वलवाडी येथे २५ वर्षीय युवकाची आत्महत्या | Youth commits suicide at Aswalwadi
अस्वलवाडी येथे २५ वर्षीय युवकाची आत्महत्या | Youth commits suicide at Aswalwadi
शिराळा,ता.२१ : अस्वलवाडी (ता. शिराळा ) येथील विशाल बाजीराव खोत ( वय २५ ) यांने आज मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या पूर्वी गावातील घराशेजारी असणाऱ्या जनावराच्या शेडमधील लाकडी तूळीला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्मह्त्तेचे नेमके कारण समजू शकले नाही. एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केल्याने खोत परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अस्वलवाडी येथे २५ वर्षीय युवकाची आत्महत्या | Youth commits suicide at Aswalwadi
या घटनेची नोंद शिराळा पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत शंकर चंद्रु खोत यांनी शिराळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. यासंदर्भात पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, बाजीराव ज्ञानदेव खोत हे त्यांची पत्नी वनिता व मुलगा विशाल असे एकत्रित राहतात. बाजीराव हे कामानिमित्त मुंबई येथे असल्याने अधूनमधून गावी येत जात असतात.
अस्वलवाडी येथे २५ वर्षीय युवकाची आत्महत्या | Youth commits suicide at Aswalwadi
त्यांचा मुलगा विशाल बाजीराव खोत हा गावामध्ये असणारा आपला शेती व्यवसाय करत होता. आज मंगळवार दिनांक २१ रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास अस्वलवाडी येथील घराचे शेजारी असणाऱ्या जनावराच्या शेडमध्ये विशालने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याच्या पश्चाता आई ,वडील व बहिण असा परिवार आहे. अधिक तपास पोलिस हवलदार डी.एस.खोमणे हे करीत आहेत.
अस्वलवाडी येथे २५ वर्षीय युवकाची आत्महत्या | Youth commits suicide at Aswalwadi
0 Comments