जत :शिक्षक बँकेच्या कर्जाचा व्याजदर कमी करावा.यासाठी समितीत राहून वारंवार आवाज उठविला पण मिरजकर आणि त्यांच्या टोळीने माझा आवाज दाबला. व्याजदर कमी करण्याचा विषय काढला की, मिरजकर माझ्याकडे रागाने पाहतात!" असा घणाघात करत..समितीचे नेते व वरिष्ठ मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष जगन्नाथ वायदंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यासह प्राथमिक शिक्षक संघात जाहीर प्रवेश केला. आज बँक वाचवण्याची गरज असून त्यासाठी आपण थोरात गटात प्रवेश करत असल्याचे वायदंडे म्हणाले.
यावेळी सदाशिवराव मोहिते, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष भानुदास चव्हाण, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायकराव शिंदे, सरचिटणीस अविनाश गुरव, अंकुश पंडित, प्रकाश सुतार, पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम सावंत, शिक्षक सोसायटीचे चेअरमन लक्ष्मणराव गायकवाड, माजी चेअरमन अण्णाराव पाटील, मागासवर्गीय संघटनेचे प्रल्हाद हुवाळे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष काटे, शिक्षक संघाचे उपाध्यक्ष बसवराज येलगार, तालुकाध्यक्ष दिलीप पवार, सरचिटणीस प्रकाश गुदळे, कार्याध्यक्ष नितीन वाघमारे, देवाप्पा करांडे, स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक पॅनेलचे उमेदवार फत्तू नदाफ, गांधी चौगुले, शब्बीर तांबोळ,श्रीकांत पवार उपस्थित होते.
जगन्नाथ वायदंडे म्हणाले की, "समितीत राहून मी जातीयवादाचे चटके सहन केलेले आहेत. विनायकरावांसारख्या निर्मळ मनाच्या माणसावर हे जातीयवादाचे आरोप करतात. यात काहीही दम नाही. विनायकरावांचा जिल्ह्यासह राज्यात चांगला लौकिक आहे. ते कर्तृत्त्ववान असल्यानेच त्यांच्यावर टीका होत आहे. विनायकरावांचा दबदबा वाढला आहे म्हणून काही निष्क्रिय लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना टिपण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
सेटलमेंटच्या अफवा पसरवून सभासदांना संभ्रमित केले जात आहे. स्वाभिमानी पॅनेलचे सर्व उमेदवार हे स्वच्छ प्रतिमेचे असल्याने सर्वांचा विजय निश्चित आहे.
यावेळी शिक्षक संघाचे नेते रमेश पाटील म्हणाले, "विनायकराव, हा सरळ आणि उमद्या मनाचा आहे. लाव्यालाव्या करणे, लांड्यालबाड्या करणे, गोड बोलून विश्वासघात करणे यात समितीचा हातकंडा आहे. कपटी, चमचेगिरी आणि एजंटगिरीला लगाम बसविणारा नेता म्हणजे विनायकराव शिंदे. त्यांचा दबदबा वाढल्यामूळे सामान्य शिक्षकाला सहज न्याय मिळू लागला आहे. त्यामूळे स्वाभिमानी पॅनेलला प्रचंड मताधिक्यांनी विजयी करा."
संजय कोळी म्हणाले, "यावेळी स्वाभिमानी पॅनेलला कोणी विरोधकच नाही. त्यामूळे स्वाभिमानीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील. यात कोणतीही शंका नाही.
यावेळी बाळासाहेब जगताप, सुभाष जाधव, सर्जेराव साळे, भारत जाधव, मधूकर पुजारी, अयुब नाईक, अमजेद नाईक,लक्ष्मण लाळगे. मारुती आवटे, भालचंद्र गडदे, रघुनाथ गडदे, सुहास उत्तरे, सुदाम कराळे, संजय काशिद, दत्तात्रय साळे, शिवराम यादव, समाधान यादव, भाऊसो यादव, वसंतराव यादव, राजाराम यादव, रियाज अत्तार, मौला शेख,
अण्णासाहेब भोसले,शांतीलाल साळुंखे, पिराप्पा ऐवळे, अशोक घोदे, अशोक कदम, शौकत नदाफ, सिकंदर शेख, नानासो पडोळकर, शिवाजी महाजन, विठ्ठल कोळी, सुभाष शिंदे, ज्ञानेश्वर टोणे,बाळासाहेब साळुंके, विठ्ठल जाधव, सिताराम यादव, भाऊसाहेब महानोर, मल्लिकार्जुन माळी, दत्तोपंत सावंता, प्रताप गावित, मनोज वसावे, गुलाबसिंग पावरा यांच्यासह स्वाभिमानी पॅनेलचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments