शिराळा येथील चोरीचा छडा; मध्यप्रदेशातील आंतरराज्य घरफोड्या करणारी टोळी जेरबंद| Theft at Shirala; Interstate burglary gang arrested in Madhya Pradesh

शिराळा,ता.२०: शिराळा येथील नलवडे कॉलनीतील घरफोडी प्रकरणी शिराळा पोलिसांनी आंतरराज्य घरफोड्या करणाऱ्या टोळीतील संशयित आरोपी रमेश केशरसिंह मेहडा (वय ३२) , महेंद केशरसिंह मेहडा (वय २९), दोघे रा. भुरीयापुरा पो. भुतिया, ता. गंधवानी जि. धार (मध्यप्रदेश), मनोज जुवानसिंह वास्केल (वय २४) रा. मुहाजा, ता, कुक्षी जि. धार (मध्यप्रदेश) यांना अटक केली असून यातील समरसिंह रतनसिंह भुरिया रा. भुतिया ता. गंधवानी जि. धार (मध्यप्रदेश) व अर्जुन उर्फ भुरु वसुनिया रा. भुतिया ता.गंधवानी जि. धार (मध्यप्रदेश) हे दोन संशयित फरारी आहेत. त्यांना ही लवकरच जेरबंद केले जाईल अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी शिराळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
शिराळा येथील चोरीचा छडा; मध्यप्रदेशातील आंतरराज्य घरफोड्या करणारी टोळी जेरबंद| Theft at Shirala; Interstate burglary gang arrested in Madhya Pradesh
यावेळी पिंगळे म्हणाले, पाच जून रोजी शिराळा येथील नलवडे कॉलनीत सौ. वनिता परेश पोवार यांच्या घरच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने, तर अमन इम्तियाज मुल्ला यांची मोटरसायकल व अंत्री बुद्रुक येथील सुरज शामराव पाटील यांच्या शिराळा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्रातून रोख रक्कम असे एकूण तीन लाख ४० हजार रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. शैलेश गायकवाड यांची हिरोहोंडा स्प्लेंडर चोरून नेली होती. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून सी,सी.टी. व्ही फुटेज तपासले असता त्यात पाचजण नलवडे कॉलनीत संशयित रित्या फिरताना दिसले. मोटरसायकल चोरून घेवून जाताना ही दिसले. तर नलवडे यांच्या शेतात एका ठिकाणी एक टॉवेल व महाराष्ट्र व कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या एस.टी.च्या चार तिकीट आढळून आल्या होत्या . त्यानुसार पोलिसांनी फुटेज, तिकीट व मोबाईल या वरून पुढील तपास सुरु केला. त्यावेळी सादर आरोपी हे टाण्डा तालुका कुक्षी जि धार ( मध्यप्रदेश ) परिसरात असल्याची माहिती मिळाली.
शिराळा येथील चोरीचा छडा; मध्यप्रदेशातील आंतरराज्य घरफोड्या करणारी टोळी जेरबंद| Theft at Shirala; Interstate burglary gang arrested in Madhya Pradesh
त्यानुसार पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम,अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबूले यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा पोलिसांचे पथक मध्यप्रदेश येथील धार जिल्हयात पाठविण्यात आले. त्यावेळी टाण्डा पोलिसांची व सांगली सायबर पोलिसांच्या मदतीने गुन्ह्यातील संशयित आरोपी रमेश मेहडा , महेंद मेहडा, मनोज वास्केल या तिघांना पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर,पोलीस हवलदार कालिदास गावडे, पोलीस नाईक संदीप पाटील, नितीन यादव, अमर जाधव यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांना १९ जून रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. संशयितांकडून चोरून नेलेल्या दोन मोटरसायकल ज्या ठिकाणी सोडल्या त्या ठिकाणाहून जप्त केल्या आहेत. चोरी झालेल्या तीन लाख ८५ हजार मुद्देमाला पैकी अटक केलेल्या तिघाकडून दोन लाख २२ हजार ४५० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरित मुद्देमाल हा फरारी असणाऱ्या संशयितांच्याकडे आहे. तो ही लवकरच मिळेल.
शिराळा येथील चोरीचा छडा; मध्यप्रदेशातील आंतरराज्य घरफोड्या करणारी टोळी जेरबंद| Theft at Shirala; Interstate burglary gang arrested in Madhya Pradesh
अमेरिकेतून आलेला फोन व एस.टी तिकीटाने दिली तपासाला दिशा
शिराळा येथील सचिन उबाळे हे अमेरिकेत आहेत. त्यांच्या घरात सी,सी,टी,व्ही. कॅमेरे बसवले आहेत. त्या रात्री त्यांचा कॅमेरा चोरट्यांनी हलवला .त्याची दिशा बदललेला मेसेज त्यांना मोबाईलवर गेला.त्यांनी लगेच शिराळा पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यामुळे चोरटे सावध झाले. तीन चोरी करण्यासाठी व दोन नजर ठेवण्यासाठी होते. पण पोलीस आल्याने तासभर ते गप्पा बसून सैरभैर झाल्याने त्यांनी एकमेकांशी मोबाईल वरून संपर्क साधल्याने त्याचा फायचा तपासाला यंत्रणेला झाला. एस.टी. तिकीट वरून ही ते कोठून आले. याची चौकशीला मदत झाली.
शिराळा येथील चोरीचा छडा; मध्यप्रदेशातील आंतरराज्य घरफोड्या करणारी टोळी जेरबंद| Theft at Shirala; Interstate burglary gang arrested in Madhya Pradesh
एस.टी. बस व चोरीच्या गाड्या हेच प्रवासाचं साधन
हे सराईत चोरटे असल्याने कोणत्याही ठिकाणी आपला सुगाव लागेल असे सोडत नाहीत. त्या त्या परिसरातील मोटरसायकल सायकलची चोरी करून त्या मध्येच सोडून पुढील प्रवास एस.टी अथवा ट्रॅव्हाल यामधून प्रवास करून नेहमी चकवा देण्यात प्रयत्न करत असतात मात्र त्यांनी घटनास्थळी टाकलेल्या एस.टी च्या तिकटी, मोबाईल संभाषण यावरून पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.
शिराळा येथील चोरीचा छडा; मध्यप्रदेशातील आंतरराज्य घरफोड्या करणारी टोळी जेरबंद| Theft at Shirala; Interstate burglary gang arrested in Madhya Pradesh
चार ठिकाणी चोरी केली
या सराईत चोरट्यांनी २० एप्रिल २०२२ रोजी जालना, अंबेजोगाई ,पैठण व बीड या ठिकाणी चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हे सराईत चोरटे असल्याचे सिद्ध होत आहे. त्यांच्या कडून आणखी चोऱ्या उघड होण्याची शक्यता आहे.
शिराळा येथील चोरीचा छडा; मध्यप्रदेशातील आंतरराज्य घरफोड्या करणारी टोळी जेरबंद| Theft at Shirala; Interstate burglary gang arrested in Madhya Pradesh
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments