बापाच्या खून प्रकरणी मुलास तीन दिवसांची पोलीस कोठडी |Son remanded in police custody for three days

कुरळप: वशी (ता वाळवा) येथील सुरेश भिमराव पाटील (वय ५४ ) यांचा भर चौकात मानेवर कोयत्याने सपासप वार करून खून केल्या प्रकरणी अटक केलेल्या प्रथमेश सुरेश पाटील (वय २० ) यास न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
बापाच्या खून प्रकरणी मुलास तीन दिवसांची पोलीस कोठडी |Son remanded in police custody for three days
ही घटना काल मंगळवार दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली होती. संशयित आरोपी प्रथमेश याचे वडील सुरेश दारू पिऊन कुरळप गावातील चौकात कट्यावर बसले होते. त्याच दरम्यान त्यांच्या दारूच्या त्रासाने कंटाळून प्रथमेश याने येवून त्यांच्या मानेवर कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केले. तो जवळच असणाऱ्या पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाला .
बापाच्या खून प्रकरणी मुलास तीन दिवसांची पोलीस कोठडी |Son remanded in police custody for three days
जखमी सुरेश यांना तातडीने कुरळप प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. त्यांची जखम खोलवर असल्याने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल येथे हलवण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. अधिक तपास कुरळप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिपक जाधव करत आहेत.

0 Comments