आज मनसेचे शिरीष पारकर शिराळा न्यायालयात हजर राहणार | MNS Shirish Parkar will be in Shirala court today

शिराळा : आज बुधवारी (ता. ८) जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोरोनामुळे तर मनसे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत हे काही कारणास्तव शिराळा न्यायालयात हजर राहणार नाहीत मात्र शिरीष पारकर हे उपस्थित राहणार असल्याची माहिती राज ठाकरे यांचे वकील ॲड रवी पाटील यांनी दिली. ठाकरे यांच्या शिराळा न्यायालयात हजर रहाण्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिरीष पारकर हे उपस्थित राहणार असल्याने न्यायालय पुढील आदेश काय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज मनसेचे शिरीष पारकर शिराळा न्यायालयात हजर राहणार | MNS Shirish Parkar will be in Shirala court today
शिराळा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यास वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिराळचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. सातपुते यांनी १८ जानेवारी २०२२ रोजी अजामीनपात्र वारंटचा आदेश केला होता. तो पोलिसाकडून बजावण्याच्या प्रतीक्षेत होता. त्यामुळे ठाकरे यांनी स्वतः न्यायालयात हजर रहून वारंट आदेश रद्द न केल्यास ८ जून २०२२ पर्यत मुंबई पोलीस ठाकरे यांना अटक करून शिराळा न्यायालयात हजर करण्याची शक्यता होती. परंतु ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याने ते हजर होणार नाहीत . राज ठाकरे, जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत व शिरीष पारकर यांच्या सह दहा जणावर बेकायदेशीर जनसमुदाय गोळा करणे,शांततेचा भंग करणे, चुकीच्या मार्गाने हुसकावणे , घोषणा बाजी करणे अशा विविध कलमाखाली शिराळा न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.
आज मनसेचे शिरीष पारकर शिराळा न्यायालयात हजर राहणार | MNS Shirish Parkar will be in Shirala court today
सन २००८ मध्ये भारतीय रेल्वे मध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसे तर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले होते. याबद्दल रेल्वेच्या कल्याण न्यायालयात राज ठाकरे यांचे विरोधात गुन्हा दाखल झाला म्हणून त्यांना रत्नागिरी येथे अटक करून कल्याण न्यायालयात नेल्याने महाराष्ट्रभर मनसेने आंदोलन करून अनेक ठिकाणी बंद पुकारला होता.
आज मनसेचे शिरीष पारकर शिराळा न्यायालयात हजर राहणार | MNS Shirish Parkar will be in Shirala court today
शिराळा तालुका मनसेकडून जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले म्हणून त्यांच्या सह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये ९ नंबरचे आरोपी म्हणून राज ठाकरे व तत्कालीन मनसेचे नेते शिरीष पारकर यांना दहा नंबरचे सह आरोपी करण्यात आले आहे.
आज मनसेचे शिरीष पारकर शिराळा न्यायालयात हजर राहणार | MNS Shirish Parkar will be in Shirala court today
त्याप्रमाणे शिराळा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात R.C.C.क्रमांक ९२/ २००८ मध्ये वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल राज ठाकरे व शिरीष पारकर यांचे विरुद्ध यापूर्वी देखील वॉरंट काढले होते. तत्कालीन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी किरण माने यांनी सन २०१४ मध्ये या दोघांच्या कडून जामीन स्वीकारून सदरचे वॉरंट रद्द केले होते.
आज मनसेचे शिरीष पारकर शिराळा न्यायालयात हजर राहणार | MNS Shirish Parkar will be in Shirala court today
त्यानंतर राज्य शासनाकडून राजकीय आंदोलनातील अनेक गुन्हे मागे घेतले होते व हा देखील गुन्हा मागे घेतला जाईल अशी अपेक्षा होती. याबाबत राज ठाकरे यांचे पातळीवर प्रयत्न देखील करण्यात आले होते . परंतु अद्यापही ही गुन्हा कायम आहे. गेल्या काही वर्षांपासून या गुन्ह्यातील कोणीही आरोपी न्यायालयात फिरकले नव्हते म्हणून डिसेंबर २०२१ मध्ये सर्व दहा आरोपी विरुद्ध न्यायालयांनी वारंटचा हुकुम काढला होता. पहिल्या आठ आरोपीनी जानेवारी २०२२ मध्ये न्यायालयात अर्ज करून वारंट हुकूम रद्द करून घेतला होता. परंतु राज ठाकरे व शिरीश पारकर हे वॉरंट पोलिसांकरवी बजावणी होऊन देखील न्यायालयात हजर राहिले नाहीत. त्यामुळे १८ जानेवारी २०२२ रोजी न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांनाच या दोघांना का अटक केली नाही अशी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
आज मनसेचे शिरीष पारकर शिराळा न्यायालयात हजर राहणार | MNS Shirish Parkar will be in Shirala court today
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments