अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू | A youth who was injured in an unidentified vehicle collision died during treatment

शिराळा: वीरवाडी( ता. शिराळा) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या मांगरूळ येथील दत्तात्रय किसन मस्के (वय ३२) याचा मृत्यू झाला. राहुल आनंदा पाटील जखमी आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू | A youth who was injured in an unidentified vehicle collision died during treatment
ही घटना काल मंगळवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत राहुल आनंदा पाटील (रा. बिळाशी) यांनी कोकरूड पोलिसात फिर्याद दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी , मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय मस्के व राहुल पाटील हे मोटरसायकलवरून कोकरूड-शिराळा रस्त्याने कोकरूड कडून मांगरूळकडे जात होते.
अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू | A youth who was injured in an unidentified vehicle collision died during treatment
दरम्यान वीरवाडी बसस्थानका समोर अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिली. अज्ञात चालक पळून गेला . त्या धडकेत मोटारसायकलस्वार दत्तात्रय मस्के हा गंभीर जखमीत झाला. तर पाठीमागे बसलेला राहुल पाटील जखमी झाला. दत्तात्रय यास पुढील उपचारासाठी कराड येथे नेले असता त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मोटरसायकलची सुमारे सात हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेखा जाधव या करीत आहेत.

0 Comments