BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळ्यात असा रंगला रिंगण सोहळा | A colorful arena ceremony in Shirala

शिराळ्यात असा रंगला रिंगण सोहळा | A colorful arena ceremony in Shirala

 

शिराळ्यात असा रंगला रिंगण सोहळा | A c


olorful arena ceremony in Shirala

 

शिराळा  : वारकरी व भाविक भक्तांच्या मोठ्या उत्साहात शिराळा शेकडो वर्ष सुरू असणाऱ्या मानाच्या गोरक्षनाथ आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्याचे आनंदनाथ महाराज यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरकडे प्रस्थान झाले . दरवर्षी जाणाऱ्या दिंडीला गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भाव असल्याने पंढरपूर वारीला जाता आले नव्हते . गोरक्षनाथांची दिंडी मानाची असते . कोल्हापूर , सांगली आणि सातारा जिल्ह्यातून वारकरी आणि भाविक या पायी दिंडीतून शिराळा ते पंढरपूर चालत जातात . 

यंदाच्या पालखी सोहळ्यात सर्वजण मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते . रिमझिम पाऊस असला तरी टाळ मृदंगाच्या गजरात रामकृष्ण हरी , ज्ञानोबा माऊली , ज्ञानराज माऊली तुकाराम नामाचा जयघोष करीत भाविक तल्लीन होऊन भक्तिरसात न्हाऊन निघाले होते . शिराळा शहरात दिंडी आल्यानंतर नागरिकांनी मोठ्या आनंदाने स्वागत केले व दिंडीत सहभागी झाले . दिंडी मार्गावर माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या निवासस्थानी भव्य रांगोळी काढून औक्षण करत नाईक कुटुंबातील सदस्यांनी स्वागत केले . गणपती चौक , कदम गल्ली ते पवळ गल्ली पर्यंत फुलांच्या पाकळ्यांचा सडा आणि रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून किसान युवक मित्र व शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने अध्यक्ष विश्वास कदम व मित्र परिवाराने स्वागत केले . विजय शिंदे , सागर कदम , आमराई हॉस्पिटल यांच्यासह अनेकांकडून शहरात दिंडी मार्गावर मसाले दूध , केळी , राजिगरा लाडू यांचे वाटप करण्यात आले होते .

वारकरी भाविक भक्तांच्या सेवेसाठी अनेक सेवाभावी व्यक्ती व संस्था यांनी पुढाकार घेऊन पाणी टँकर , महाप्रसाद तसेच दिंडी सहभागी झालेल्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवल्या आ दिंडीच्या सुरवातीला पांढरा शुभ्र देखणा अश्व . त्यामागे भगव्या पताका खांद्यावर घेतलेले भाविक नंतर टाळ मृदुंग घेऊन हरिनामाचा जयघोष करणारे वारकरी . त्यांच्या मागे तुळस डोक्यावर घेणाऱ्या महिला . त्यानंतर मुख्य पालखी रथ आणि त्याच्या पाठीमागे वारीत सहभागी झालेले भाविक असा देखणा नजारा दिंडी सोहळ्याचा होता . शिराळा बस स्थानक येथे चाललेल्या रिंगण सोहळ्यात आपला बाजारच्या अध्यक्षा सुनीत देवी नाईक , माजी नगराध्यक्ष प्रतिभा पवार , सुनंदा सोनटक्के अर्चना कदम , कल्पना गायकवाड उपस्थिती होत्या .

आमदार मानसिंगराव नाईक विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 👇

१) नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वाचा  तिहेरी संगम आमदार मानसिंगराव नाईक(भाऊ)

२) बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा  आमचा हक्काचा भाऊ

३) विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक

४)समाजकारणाला प्राधान्य : आमदार मानसिंगराव नाईक

५) चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास

६) जिल्हा बँकेवर अभिनंदनीय निवड

७) नवा इतिहास रचला 

 ८) विकास कामांचा झपाटा 

 बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा  आमचा हक्काचा भाऊ| Our rightful brother who reduces the burden on the sister's head













गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================



 

Post a Comment

0 Comments