BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

राज ठाकरे यांना न्यायालयाचा दिलासाअटक वॉरंट रद्द | Court-releases-consolation-warrant-for-Raj-Thackeray

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात शिराळा न्यायालयाने १८ डिसेंबर २०२१ रोजी काढलेले  अजामीनपात्र अटक वॉरंट इस्लामपूर येथील  अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आज शुक्रवारी  १७ जून रोजी रद्द केले . त्यामुळे राज ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे . ठाकरे यांची न्यायालयात हजर राहण्याची गरज असेल त्यावेळी व्हीडीओ कॉन्फरसिंगव्दारे ते हजेरी लावतील. त्यामुळे  केससाठी  भविष्यात त्यांना  शिराळा न्यायालयात हजर राहणेची गरज भासणार नाही.

राज ठाकरे यांना न्यायालयाचा दिलासाअटक वॉरंट रद्द | Court-releases-consolation-warrant-for-Raj-Thackeray

मराठी तरुणांना रेल्वेत नोकरी मिळावी म्हणून मनसेने राज्यभर सन २००८ आंदोलन केले होते.शिराळा तालुका मनसेकडून जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले म्हणून  त्यांच्या सह दहा  जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये ९ नंबरचे आरोपी म्हणून  राज ठाकरे व तत्कालीन मनसेचे नेते  शिरीष पारकर यांना  दहा नंबरचे  सह आरोपी करण्यात आले आहे.

राज ठाकरे यांना न्यायालयाचा दिलासाअटक वॉरंट रद्द | Court-releases-consolation-warrant-for-Raj-Thackeray

 यावेळी कोकरूड पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  या खटल्याची सुनावणी शिराळा न्यायालयात सुरू होती. शिराळा येथील न्यायालयात कोरोना कालावधीनंतर न्यायालयाच्या  कामकाजाच्या तारखाबाबत ठाकरे यांना  माहिती न मिळाल्याने ते न्यायालयात सुनावणीकामी हजर राहू शकलेले नाहीत . त्यामुळे  यांच्या विरूध्द अजामीनपात्र वॉरंट काढलेले होते .  ठाकरे यांचेवतीने मनसे विधीकक्षाचे अध्यक्ष अॅड . किशोर शिंदे  , मनसेचे ज्येष्ठ विधीज्ञन  अॅड . शिरोडकर  , अॅड . अरूण लंबूगोळ , अॅड . अर्चित साखळकर यांच्या  मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा विधी कक्ष अध्यक्ष अॅड . आनंदा चव्हाण यांनी व  उपरोक्त केसच्या कामी कामकाज पाहणारे अॅड . विजय खरात , शिराळा बारचे अध्यक्ष अॅड . सतिश कदम यांनी शिराळा येथील न्यायालयामध्ये सदरचे वॉरंट रद्द करणेकरीता अर्ज दाखल केलेला होता .

राज ठाकरे यांना न्यायालयाचा दिलासाअटक वॉरंट रद्द | Court-releases-consolation-warrant-for-Raj-Thackeray

 न्यायालयाने  ७ मे  रोजी  नामंजूर केल्याने या आदेशावर नाराज होवून  जिल्हा व सत्र न्यायालय , इस्लामपूर न्यायालयात  रिव्हीजन दाखल केला होता. त्यावर  सोमवारी न्यायाधीश जयश्री परदेशी यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली होती.  सरकारी पक्षातर्फे  रणजीत पाटील यांनी तर राज ठाकरे यांच्या बाजूने  विजय खरात, सतीश कदम, आनंद चव्हाण यांनी युक्तिवाद केला होता.

राज ठाकरे यांना न्यायालयाचा दिलासाअटक वॉरंट रद्द | Court-releases-consolation-warrant-for-Raj-Thackeray

त्यावर आज १७ जून रोजी  न्यायालयाने त्यांना अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द केले आहे.  अॅड . अभिषेक जगताप , अॅड . सिध्दार्थ नागोरी, अॅड . नीरज महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर निकालाच्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर गर्दी केली  होती. संपुर्ण कामकाजामध्ये इस्लामपूर शहराध्यक्ष सनी खराडे व सर्व मनसे सैनिक यांचे मोलाचे योगदान लाभले . निकालानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मिठाईचे वाटप केले . यावेळी अॅड . विजय खरात , अॅड . सतिश कदम, इस्लामपूर मनसे शहराध्यक्ष  सनी खराडे यांचा मनसे कोल्हापूर जिल्हा विधीकक्ष अध्यक्ष अॅड . आनंदा चव्हाण यांचे हस्ते  सत्कार करण्यात आला . यावेळी उदय पाटील , विजय भालकर , मंगेश जाधव , अतुल शिंदे , सतिश पवार , भास्कर चव्हाण , अरविंद कदम यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .

राज ठाकरे यांना न्यायालयाचा दिलासाअटक वॉरंट रद्द | Court-releases-consolation-warrant-for-Raj-Thackeray

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments