तरुणाईचा आयडॉल-नगरसेवक केदार नलवडे| Youth Idol-Corporator Kedar Nalwade
तरुणाईचा आयडॉल-नगरसेवक केदार नलवडे| Youth Idol-Corporator Kedar Nalwade
तरुणाईचा आयडॉल-नगरसेवक केदार नलवडे| Youth Idol-Corporator Kedar Nalwade
कमी वयात सामाजिक बांधिलकी जोपासत संघटन कौशल्याच्या जोरावर राजकीय पटलावर स्वकर्तृत्ववावर आपले वेगळे अस्तित्व निर्माण करत तरुणाईचा आयडॉल म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करून कॉंग्रेसचा छोटा कार्यकर्ता ते महाडिक युवा शक्तीचा नगरसेवक व भाजपचा कार्यकर्ता अशी राजकीय मजल मारणाऱ्या नगरसेवक केदार नलवडे ( भैय्या) यांचा आज १ जुन रोजी वाढदिवस .त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यक्र्तुत्वाचा घेतलेला आढावा .......
तरुणाईचा आयडॉल-नगरसेवक केदार नलवडे| Youth Idol-Corporator Kedar Nalwade
केदार यांचे आजोबा मारुतीराव नलवडे हे शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष होते. वडील नितीनराव नलवडे हे कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते. घरी राजकीय वातावरण पण त्यांच्या वडिलांना राजकीय पटलावर म्हणावे तेवढे यश आले नाही. ती उणीव केदार यांनी कमी वयात भरून काढली. वयाच्या १५ व्या वर्षापासून केदारने कॉंग्रेसचा छोटा कार्यकर्ता म्हणून आपला राजकीय प्रवास सुरु केला. लोककल्याणकारी विचार, प्रचंड जिद्द ,कर्तृत्व ,आत्मविश्वास, सर्व सामान्य जनतेबद्दल असणारी आपुलकी , प्रेम व अफाट इच्छा शक्ती अशा विविध पैलुमुळे कॉंग्रेसचा छोटा कार्यकर्ता ते महाडिक युवा शक्तीचा नगरसेवक आणि आता भाजप कार्यकर्ता असा एक राजकीय प्रभाव निर्माण केला.
तरुणाईचा आयडॉल-नगरसेवक केदार नलवडे| Youth Idol-Corporator Kedar Nalwade
२५ व्या वर्षी शिराळा नगरपंचायतमध्ये नगरसेवक झाले.महाडिक युवा शक्तीचा शिराळ्यातील प्रमुख शिलेदार म्हणून अध्यक्ष पदाची धुरा प्रामणीकपणे सांभाळत आहे. युवकांना योग्य दिशा देऊन त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याने शिराळा तालुक्यात महाडिक युवा शक्ती नावारूपास आली आहे. सम्राट महाडिक यांच्या विचारांचा पाईक म्हणून शिराळा तालुक्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या गावात वाडीवस्तीवर महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून हजारो युवकांचे संघटन करून महाडिक युवा शक्तीची भक्कम फळी निर्माण केली आहे.
तरुणाईचा आयडॉल-नगरसेवक केदार नलवडे| Youth Idol-Corporator Kedar Nalwade
नगरसेवक म्हणून शिराळ्यात सार्वजनिक , वैयक्तिक, सामाजिक प्रश्न सोडवुन महत्त्वाची भुमिका बजावत आहेत. प्रशासनाबरोबर जेवढे सालोख्याचे संबंध तेवढेच सामान्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्याशी कडवट धोरण राबवत शहराच्या विकासासाठी सातत्याने धडपड सुरु आहे.
तरुणाईचा आयडॉल-नगरसेवक केदार नलवडे| Youth Idol-Corporator Kedar Nalwade
शिराळा नगरपंचायतीने शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील पहिले कृषी बजेट तयार करावे , शिराळा हद्दीमधील सर्वे नं ११८ मधील गायरान जमिनीतील प्लाॅट गरजू व भूमिहीन मजुरांना सनद नुसार ७/१२ ला नोंद करून मिळावी , निकृष्ट धान्य वाटप व इतर अनेक सार्वजनिक व लोकांचे वैयक्तिक लाभ या याबाबत मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करून ते प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरु असून काही मार्गी लागले आहेत. त्याचाच परिपाक म्हणून राज्यातील पहिले कृषी बजेट नगरपंचायतने मान्य केले आहे.
तरुणाईचा आयडॉल-नगरसेवक केदार नलवडे| Youth Idol-Corporator Kedar Nalwade
शिराळा येथे महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून लाखांची दहीहंडीचे आयोजन केले जाते.कोरोना काळात शिराळा शहरातील १०० गरजू कुटुंबांना व नगरपंचायत सफाई कामगार यांना अन्नधान्य किट वाटप,शिराळा शहरातील लोकांना घरपोच मोफत भाजीपाला वाटप, क्वारंंटाईन लोकांना बिस्किटे, पाणी बाटल्या , मास्क, कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना मोफत अंडी वाटप करून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. अशा या कर्तुत्ववान नेतृत्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा .
तरुणाईचा आयडॉल-नगरसेवक केदार नलवडे| Youth Idol-Corporator Kedar Nalwade
---------------------------------------------------------------------------------------------
नगरसेवक केदार नलवडे यांनी राबविलेले अनेक उपक्रम हेडिंगवर क्लिक करून वाचा
\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\
गरजू व भूमिहीन मजुरांचे प्लाॅट ७/१२ ला नोंद करून द्या
========================================
=============================================================
निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप-नगरसेवक केदार नलवडे
=====================================================
भाजपाच्या विध्यार्थी संघर्ष यात्रेचे शिराळ्यात महाडिक युवा शक्तीच्यावतीने स्वागत
==========================================
सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठीच महाडिक युवा शक्ती-नगरसेवक केदार नलवडे
==============================================
नगरसेवक केदार नलवडे यांनी केले १०० जणांना जीवनावश्यक किट वाटप
===================================================
वाढीव विजबिल व वीज तोडणी विरोधी भाजपचे आंदोलन
=====================================
शिराळा येथे सम्राट महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे दुध दरवाढीसाठी आंदोलन
=============================================
शिराळा येथे नानासाहेब महाडिक यांना विनम्र अभिवादन
===========================================
महाडीक युवा शक्तीच्या लाखाच्या दहीहंडीवर तासगावच्या "शिवनेरी"चा ताबा
=============================================
शिराळ्यात उद्या बुधवारी महाडीक युवा शक्तीची लाखाची दहीहंडी: सम्राट महाडीक
=============================================
शिराळ्यात बुधवारी ५ सप्टेंबरला महाडीक युवा शक्तीची लाखाची दहीहंडी: सम्राट महाडीक
====================================================
स्वाभिमानी संघटनेच्या यादीत पहिला आमदार म्हणून सम्राट महाडीक यांचे नाव असेल: डॉ. निलेश राणे
==================================================
0 Comments