सांगली वन विभाग व बी बास्केट पूणे यांचे संयुक्त विद्यामाने सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमच मधमाश्या संवर्धन व बचाव या बाबत कार्यशाळा आयोजित केलेली होती.
यावेळी वन विभागाचे कर्मचारी, सर्प मित्र, वन्यजीव प्रेमी यांना शहरी व ग्रामीण भागातील मधमाशा संवर्धन या बाबत मार्गदर्शन करुन मधमाशाचे पेाळे कसे काढावे आणि पून्हा ते पोळे त्याच जागी ठेवून हाक्काचे घर देता येवू शकते किंवा त्यांचे पून्हा पूर्नस्थापन करता येते या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मधमाशा हा निसर्गातील छोटासा घटक असून तो महत्त्व पूर्ण आहे. मधमाशाव्दारे परागीभवन होवून शेती उत्पन्न व फळ उत्पन्नात वाढ होणेस अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावते . आज अज्ञाना पोटी अशी मधाचे पोळे जाळून तसेच किटकनाशके मारुन काढले जातात.
या मध्ये लाखो माशा मारल्या जातात. त्यामूळे जैवविविधता मधील एक घटक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मधमाशा ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण हा औषधी मध तयार करुन देतात. त्यामधून उत्पन्नाचे एक स्त्रोत निर्माण होते .यासाठी मधमाशी संवर्धन करणे गरजेचे असल्याचे उप वनसंरक्षक विजय माने ,सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे , मधमाशी प्रशिक्षक,संजय मारणे व बी बास्केट पूणे,संचालक अमित गोडसे मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील यांनी मार्गदर्शन केले .
वनक्षेत्रपाल युवराज पाटील सांगली यांनी आभार मानले या कार्यशाळेस सांगली वन विभागातील कर्मचारी, सर्पमित्र व खरशिंग चे सरपंच सुहास पाटील उपस्थित होते.
0 Comments