मादळगाव येथे रस्त्यावरून दोन गटात मारामारी | Two groups fight on the road at Madalgaon
मादळगाव येथे रस्त्यावरून दोन गटात मारामारी | Two groups fight on the road at Madalgaon
मादळगाव येथे रस्त्यावरून दोन गटात मारामारी | Two groups fight on the road at Madalgaon
शिराळा, ता. :मादळगाव येथील जाधवमळ्यामध्ये शेतात रस्त्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन गटातील २५ जणांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत चार जण जखमी झाले आहेत. याबाबत शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. वनिता बाळासो जाधव (वय ४०) व जीना बाबासो जाधव (वय ४५) यांनी परस्परविरोधी फिर्याद दाखल केल्या आहेत.
मादळगाव येथे रस्त्यावरून दोन गटात मारामारी | Two groups fight on the road at Madalgaon
ही घटना शुक्रवारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. याबबत शिराळा पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, मादळगाव( विरवाडी ) येथील वाकुर्डे बुद्रुक ते वाकुर्डे खुर्द दरम्यान असणाऱ्या जाधवमळा येथे वनिता बाळासो जाधव यांनी रोडवरील दगड काढू नका व ट्रॅक्टर बंद करा असे सांगितल्याच्या कारणावरून वैशाली प्रकाश जाधव,जिना बाबासो जाधव, सविता भीमराव जाधव, सुनिता अरुण जाधव, सुजाता महादेव जाधव, सुरेखा आनंदा जाधव, नंदा पोपट जाधव, शैला गुंगा जाधव, कल्पना शिवाजी जाधव, आनंदा जाधव रा. मादळगाव दत्ता केसरे रा.काळामावाडी ता. वाळवा या ११ जणांनी यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामध्ये वनिता बाळासो जाधव,मयुरी आनंदा जाधव व आक्काताई अशोक जाधव ह्या जखमी झाल्या आहेत .
मादळगाव येथे रस्त्यावरून दोन गटात मारामारी | Two groups fight on the road at Madalgaon
रोडवरील दगड जे.सी.बी.च्या सहायाने काढण्याच्या कारणावरून आनंदा आकाराम जाधव, वनिता बाळासो जाधव, मयुरी आनंदा जाधव, आकाताई अशोक जाधव, नंदा शंकर जाधव, सुमन शिवाजी जाधव, शारदा शिवाजी जाधव, सुवर्णा रघुनाथ जाधव, ज्योती युवराज जाधव, आकाराम सखाराम जाधव, बाळासो सखाराम जाधव,अशोक आण्णा जाधव, रघुनाथ ज्ञानू जाधव, शंकर ज्ञानू जाधव रा.मादळगाव या १४ जणांनी केलेल्या मारहाणीत जीना बाबासो जाधव ह्या जखमी झाल्या आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार सुभाष पाटील हे करत आहेत.
मादळगाव येथे रस्त्यावरून दोन गटात मारामारी | Two groups fight on the road at Madalgaon
0 Comments