BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाटेगाव खून प्रकरणी दोघांना अटक | Two arrested in Wategaon murder case

वाटेगावात  युवकाचा खून| Murder of a youth in Vategaon



वाटेगावात  युवकाचा खून| Murder of a youth in Vategaon

वाटेगावात  युवकाचा खून| Murder of a youth in Vategaon


वाटेगावात  युवकाचा खून| Murder of a youth in Vategaon

  वाटेगाव : वाटेगाव (ता वाळवा ) येथील भुयाचा घोळ परिसरातील ओढ्यात (ओढा पात्रात ) सोमवारी रात्री दारू पिऊन शिव्या दिल्याच्या कारणावरून दोन मित्रांनीच प्रवीण प्रकाश साळुंखे उर्फ भावड्या (वय३२) रा.वाटेगाववाडी विभाग याचा  खुन केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. खून प्रकरणी गणेश उर्फ बारक्या मधुकर चव्हाण (वय 32) व्यवसाय मजुरी रा. वाटेगाववाडी व मोहन उर्फ बाळ्या चव्हाण (वय 24)  व्यवसाय मजुरी रा. वाटेगाववाडी ता वाळवा यांना कासेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

वाटेगावात  युवकाचा खून| Murder of a youth in Vategaon

 

या बाबत प्रकश हिंदुराव साळुंखे (वय ६०) रा.वाटेगाववाडी  यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. मंगळवारी सकाळी पोलीस पाटील संतोष करांडे यांना सदर घटनेबाबत निनावी फोन आला. त्यांनी घटनास्थळी जाऊन पहिले व सदरची माहिती कासेगाव पोलिसांना दिली.  घटनेची माहिती मिळतात कासेगाव पोलीस ठाण्याचे स. पो. नि अविनाश मते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी  कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळाला भेट दिली. 

वाटेगावात  युवकाचा खून| Murder of a youth in Vategaon

 

 यावेळी सांगलीचे स्वान पथक घटनास्थळी दाखल झाले.  स्वान घटनास्थळापासून भाटवाडीकडे जाणाऱ्या मार्गावरती ३०० मिटर अंतरावर घुटमळले.  अधिक तपास सह्ययक पोलीस निरीक्षक अविनाश मत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली  संग्राम कुंभार, अविनाश लोहार, आनंद उथळे यांनी सुरु केला. 

 

वाटेगावात  युवकाचा खून| Murder of a youth in Vategaon

सहा तासात आरोपींना अटक 

 गणेश उर्फ बारक्या मधुकर चव्हाण व  मोहन उर्फ बाळ्या चव्हाण यांना पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. गणेश, मोहन,प्रवीण हे  तिघे मित्र सोमवारी रात्री  दारू प्यायला एकत्र आले. दारू पित असताना  बोलता बोलता शिवीगाळ सुरू झाली. शिव्या का दिल्यास म्हणून चिडून जाऊन मोहन व गणेशने  प्रवीणला उसाच्या दंडक्याने, हाताने व लाथांनी तोंडावर व डोक्यावर मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला.प्रवीणच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.अधिक तपास सह्ययक पोलीस निरीक्षक अविनाश मत्ते करत आहेत.

 




Post a Comment

0 Comments