शिराळा: नाटोली ( ता.शिराळा) येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून या बाबत घरात सांगितल्यास भावास जीवे मारण्याची धमकी देत व वारंवार ३ लाखाची खंडणी घेतल्या प्रकरणी राजू गुंडा वारे (वय ३४ रा.नाटोली ) , गणेश लक्ष्मण महापुरे ( वय २२ ) रा. सरुड (ता . शाहूवाडी जि . कोल्हापूर) या दोन्ही संशयितांना शिराळा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पीडित मुलीने शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलीसातून समजलेली माहिती अशी, गणेश महापुरे हा मुलीच्या नात्यातील असून त्याने एक वर्षापासुन आज पर्यंत जोतिबा ( ता.पन्हाळा, जि. कोल्हापूर) मंदीराचे पायथ्याशी असलेल्या एका लॉजवर नेऊन बलात्कार केला. गणेश महापुरे बरोबर असणारे हे प्रेमसंबंध घरच्यांना सांगेन अशी धमकी देऊन पीडित मुलीवर संशयित राजू वारे याने सागाव येथील मंदीरा जवळ जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले होते.
या दोघा संशयितांनी या पीडित मुलीकडून वारंवार पैशाची मागणी करत तीन लाख रुपये खंडणी घेतली आहे. या घटनेबाबत घरी सांगितलेस तर तुझ्या भावाला ठार मारीन अशी धमकी दिली. त्यामुळे त्या दोघांच्यावर बाललैगिक अत्याचार प्रतिबंधक , बलात्कार ,खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांना राहत्या घरातुन पहाटे चारच्या दरम्यान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर , दीपक हांडे ,विनोद पाटील , बाबुराव पाटील , महेश साळुंखे , गणेश झंझारे यांच्या पथकाने अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार हे करीत आहेत.
0 Comments