उपवनसंरक्षक विजय माने यांना निलंबित करा| Suspend Deputy Forest Ranger Vijay Mane
उपवनसंरक्षक विजय माने यांना निलंबित करा| Suspend Deputy Forest Ranger Vijay Mane
उपवनसंरक्षक विजय माने यांना निलंबित करा| Suspend Deputy Forest Ranger Vijay Mane
महिला अधिकाऱ्याच्या विनयभंग प्रकरणी उपवनसंरक्षक विजय माने यांना निलंबित करावे अशी मागणी फॉरेस्ट रेंज असोशिएशन शाखा कोल्हापूरच्यावतीने मुख्य वनसंरक्षक रामानुजम व कुपवाडचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
उपवनसंरक्षक विजय माने यांना निलंबित करा| Suspend Deputy Forest Ranger Vijay Mane
या निवेदनात म्हटले आहे, या घटनेचा संघटनेमार्फत तीव्र निषेध व्यक्त करत आहे . यापूर्वीसुध्दा आमच्या संघटनेच्या सदस्या दिवंगत दिपाली चव्हाण यांचे बाबतीत सुध्दा उपवनसंरक्षक शिवकुमार याने दबाव निर्माण केल्यामुळे व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी याने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे चव्हाण यांना आत्महत्या करावी लागलेली आहे . यावेळी वनक्षेत्रपाल संदीप जोपळे, अमित भोसले, शिशुपाल पवार , सचिन जाधव, नंदकुमार नलावडे, सोनल कोंडूस्कर, स्मिता डाके, प्रियांका दळवी, शीतल पाटील, अरविंद कांबळे उपस्थित होते.
उपवनसंरक्षक विजय माने यांना निलंबित करा| Suspend Deputy Forest Ranger Vijay Mane
या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये याच्यासाठी आमच्या संघटनेमार्फत राज्यभर तीव्र निषेध करून विजय माने यांच्या निलंबनाची मागणी करीत आहोत . महिला अधिकारी यांच्याशी जबरदस्तीने गैरवर्तन करून विनयभंग करणारे माने यांच्यावर गुन्हा नोंदविलेला आहे . त्याप्रमाणे त्यांना अटक करून निलंबनाची कारवाई न केल्यास फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशन या संघटनेमार्फत राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल .
उपवनसंरक्षक विजय माने यांना निलंबित करा| Suspend Deputy Forest Ranger Vijay Mane
0 Comments