त्रासाला कंटाळून मुलानेच केला वङीलाचा खून| Son murders father
त्रासाला कंटाळून मुलानेच केला वङीलाचा खून| Son murders father
त्रासाला कंटाळून मुलानेच केला वङीलाचा खून| Son murders father
त्रासाला कंटाळून मुलानेच केला वङीलाचा खून| Son murders father
कुरळप: वशी (ता वाळवा) येथील व्यसनाधीन वङीलाच्या सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून मुलगा प्रथमेश सुरेश पाटील (वय २० ) याने वङील सुरेश भिमराव पाटील ((वय ५४ ) यांचा भर चौकात मानेवर कोयत्याने सपासप वार करून खून केला. या घटनेनंतर तो स्वतः कुरळप पोलीस ठाण्यात हजर झाला.
त्रासाला कंटाळून मुलानेच केला वङीलाचा खून| Son murders father
याबाबत कुरळप पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की वशी ता.वाळवा येथील सुरेश भिमराव पाटील हे गावातील एका खाजगी दुध संथेत सचिव म्हणून अनेक वर्षापासून काम करत होते .पंरतु त्यांना अनेक वर्षापासून दारूचे व्यसन होते .त्यातून कुटुंबाला सतत त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून त्यांच्या पत्नीने 15 वर्षापुर्वी पेटवून घेवून आत्माहत्या केली होती.त्यावेळी एक मुलगा व मुलगी होती. आईच्या मृत्यू नतंर त्या दोन मुलांचा आजी आजोबा साभांळ करत होते.
त्रासाला कंटाळून मुलानेच केला वङीलाचा खून| Son murders father
मंगळवार दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सुरेश दारू पिऊन कुरळप गावातील चौकात कट्यावर बसले होते. त्याच दरम्यान मुलगा प्रथमेश याने येवून त्यांच्या मानेवर कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केले. तो जवळच असणाऱ्या पोलीस ठाण्यात हजर झाला .
त्रासाला कंटाळून मुलानेच केला वङीलाचा खून| Son murders father
जखमी सुरेश यांना तातडीने कुरळप प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यांची जखम खोलवर असल्याने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल येथे हलवण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास कुरळप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिपक जाधव करत आहेत.
त्रासाला कंटाळून मुलानेच केला वङीलाचा खून| Son murders father
0 Comments