दोन्ही विरोधकांना मदत करून ही विश्वासघात केला-सत्यजित देशमुख | Satyajit Deshmukh betrayed by helping both the opponents

दोन्ही विरोधकांना आम्ही मदत केली परंतु त्यांनी कायम विश्वासघात केला, केसाने गळा कापण्याचे काम त्यानी केले. स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचा स्वाभिमानी विचार संपवण्याचा घाट काही मंडळींनी घातला आहे. त्याला स्वाभिमानी कार्यकर्ते आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांनी केले.
मराठेवाडी ता.शिराळा येथे आयोजित जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 61 लाख रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ,नवीन ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटन, संरक्षण भिंत कामाचा शुभारंभ अशा विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
दोन्ही विरोधकांना मदत करून ही विश्वासघात केला-सत्यजित देशमुख | Satyajit Deshmukh betrayed by helping both the opponents
दोन्ही विरोधकांना मदत करून ही विश्वासघात केला-सत्यजित देशमुख | Satyajit Deshmukh betrayed by helping both the opponents
यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले:- स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांनी कार्यकर्त्यांना चांगली शिकवण दिली आहे.कधी ही कुणाला त्रास दिला नाही.जो काही निर्णय असेल तो प्रामाणिक करायचा केला. दोन्ही विरोधकांना मदत केली परंतु त्यांनी कधीही कार्यकर्त्याचा सन्मान केला नाही. उलट माझ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यकर्ता खचला तर संघटना अडचणीत येईल अशा चुकीचा अविर्भाव काही लोकांचा झाला आहे. परंतु हा कार्यकर्ता संघर्षातून तयार झाला असून कोणत्याही आव्हानाला सामोरे जायची तयारी केली आहे. कार्यकर्त्यांनी संघटित होऊन विरोधकांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज व्हावे असे आव्हान देशमुख यांनी केले.
माजी जिल्हा परिषद सदस्य के.डी.पाटील, करूंगली सरपंच संजय पाटील, मराठेवाडी सरपंच बंडू मराठे, उपसरपंच धोंडीराम मराठे, माजी सरपंच श्याम मराठे,भाऊसो मराठे, यशवंत मराठे, पांडुरंग मराठे,वसंत कारंडे,बाळासो मराठे खाशाबा मराठे, शंकर जाधव, भीमराव मोरे, उत्तम मराठे, ईश्वरा मराठे, दगडू मराठे, केशव मोरे,महादेव मोरे,सर्जेराव मराठे, मारुती जाधव, आनंदा मराठे, विनायक मराठे, नाना जाधव,अमोल मराठे,सदाशिव मोरे, आबासो वाठारकर,बाळासो मराठे,गोविंद मराठे यांच्यासह या गावातील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन्ही विरोधकांना मदत करून ही विश्वासघात केला-सत्यजित देशमुख | Satyajit Deshmukh betrayed by helping both the opponents
0 Comments