BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पाडळीवाडीत विधवा प्रथा बंदचा ठराव |Resolution to stop widow practice in Padliwadi

शिराळा: पाडळीवाडी, (ता.शिराळा)  येथील ग्रामसभेमध्ये विधवा प्रथा बंद करण्यासंदर्भात सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.  या निर्णयासाठी पुढाकार घेणाऱ्या सरपंच, उपसरपंच सदस्या व पोलीस पाटील या सर्व महिलाच आहेत. या ठरावासाठी सूचक जयगीता पाटील असून अनुमोदन अनिता पाटील यांचे आहे.

पाडळीवाडीत  विधवा प्रथा बंदचा  ठराव |Resolution to stop widow practice in Padliwadi

यावेळी विस्तार अधिकारी आर.एस. मठकरी,ग्रामसेवक दिग्विजय राऊत-, सरपंच पुष्पा पाटील, उपसरपंच सारिका पाटील, पोलीस पाटील सुहानी साळुंखे,  सदस्या  सुवर्णा अंकुश पाटील, सुवर्णा संदीप पाटील,  शीतल सुहास चव्हाण,अशोक पाटील, विनोद पाटील यांचं सह गावातील विधवा महिला जयगीता  पाटील,  अनिता पाटील,  वनिता पाटील व इतर महिला उपस्थित होत्या.

पाडळीवाडीत  विधवा प्रथा बंदचा  ठराव |Resolution to stop widow practice in Padliwadi

शिराळा तालुक्यात किनरेवाडी ग्रामपंचायत नंतर असा विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक ठराव करणारी पाडळीवाडी ही दुसरी ग्रामपंचायत ठरली. पतीच्या मृत्यूसमयी पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसले जाते, गळ्यातील मंगळसूत्र तोडले जाते, हातातील हिरव्या रंगाचा बांगड्या फोडल्या जातात, पायातील जोडवी काढली जातात, लग्न, हळदी-कुंकू अश्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात प्रवेश नाकारला जातो, समाजात वावरताना सन्मानाची वागणूक मिळत नाही.

पाडळीवाडीत  विधवा प्रथा बंदचा  ठराव |Resolution to stop widow practice in Padliwadi

समाजामध्ये खोलवर रुजलेल्या अश्या अनिष्ट व अघोरी प्रथामुळे, जाचक रूढी परंपरामुळे स्त्रियांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर अनेक बंधने लादली जातात. या अनिष्ठ प्रथा बंद व्हाव्यात, विधवा महिलांना देखील समाजात सन्मानाने जगता यावे, एक व्यक्ती म्हणून सर्व अधिकार मिळावेत याकरिताच पाडळीवाडी ग्रामपंचायत ने हा अतिशय क्रांतिकारी व ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

पाडळीवाडीत  विधवा प्रथा बंदचा  ठराव |Resolution to stop widow practice in Padliwadi

Post a Comment

0 Comments