ओळख फुलांची -रातराणी|"Queen of Dark
ओळख फुलांची -रातराणी|"Queen of Dark
सुगंध म्हटल की क्षणात आठवणारी फुलझाडं म्हणजे जाई, जुई, चमेली, अनंत, इत्यादी. पण त्याच तोडीच अजून एक फुलझाड आहे ते म्हणजे "Queen of Dark - रातराणी". हिच्या नावातच ह्या झाडाच सारं आहे. म्हणजेच रातराणीची फूलं हि रात्री फुलतात, त्यांचा सुगंध रात्रभर दरवळत राहतो. रातराणीचा सुगंध मंत्रमुग्ध करणारा आहे. हि अतिशयोक्ती नसुन सत्य आहे. आपण ज्या जागी/ खोलीत झोपतो त्या खोलीच्या जवळपास जर रातराणीच झाड असेल तर नक्कीच रात्रीही प्रसन्न वाटत. परंतु, ह्याची फुल सुद्धा नाजूक आणि रेखीव असतात. Beauty with Aroma indeed.
ओळख फुलांची -रातराणी|"Queen of Dark
रातराणी खूप स्वच्छंदी फुलझाड आहे. ह्याची तितकीशी काळजी घेण्याची गरज नसली तरी रातराणीचा बहर भरघोस ठेवण्यासाठी सतत न चुकता pruining करणे गरजेचे आहे ( किमान ३-४ महिन्यातून एकदा ). दर १५ ते २० दिवसांनी खत द्यावे. रातराणीसाठी नेहमी मध्यम किंवा मोठ्या आकाराच्या कुंडीचा वापर करावा. भरपूर सूर्यप्रकाश आणि नियमितपणे पाणी द्यावे. रातराणीला सहसा कीड लागत नाही.
सौ.वर्षा चौगुले( सत्याण्णा)पुणे यांच्या संग्रहातून (क्रमशः )
ओळख फुलांची -रातराणी|"Queen of Dark
0 Comments