वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांचे सर्व क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे नियोजन करा - सत्यजित देशमुख | Plan to bring all areas of Wakurde Budruk Yojana deprived of water under Olitha - Satyajit Deshmukh

शिराळा,ता.२४:वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या पाण्यापासून सद्यस्थितीला वंचित असणाऱ्या गावांचे सर्व क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे नियोजन करण्या बाबतच्या सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी दिल्या.
वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांचे सर्व क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे नियोजन करा - सत्यजित देशमुख | Plan to bring all areas of Wakurde Budruk Yojana deprived of water under Olitha - Satyajit Deshmukh
वाकुर्डे बुद्रुक योजना व वारणा डावा कालवा कामाच्या आराखड्याबाबत नियोजन व असणाऱ्या अडचणींबाबत आयोजित बैठकीत बोलत होते.यावेळी देशमुख म्हणाले, वाकुर्डे बुद्रुक टप्पा १,२ व ३ च्या कामाबाबत आराखडा होत आहे. या योजनेच्या पाण्यापासून सद्यस्थितीला वंचित असणाऱ्या कोंडाईवाडी,धामवडे, गिरजवडे, शिरशी, आंबेवाडी,निगडी,औंढी करमाळे, बेलदारवाडी या गावातील क्षेत्र ओलिताखाली यावे असा आराखडा तयार करण्यात यावा. करमाळे गावातील क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठीचे नियोजन करावे, ज्या अडचणी येत आहेत त्या दूर कराव्यात. धामवडे गावातील क्षेत्र या पाण्यापासून ओलिताखाली येण्याबाबतचे नियोजन करण्यात यावे. वाळवा तालुक्यामध्ये असणाऱ्या गावांचे क्षेत्र मोठे आहे.
वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांचे सर्व क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे नियोजन करा - सत्यजित देशमुख | Plan to bring all areas of Wakurde Budruk Yojana deprived of water under Olitha - Satyajit Deshmukh
त्यामुळे या ठिकाणचे नियोजन योग्य पद्धतीने करून जास्तीचे क्षेत्र कसे ओलिताखाली आणता येईल याचे नियोजन करण्यात यावे. वाकुर्डे योजनेला केंद्र सरकारच्या नाबार्ड अंतर्गत व अन्य सिंचन योजने मधून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही देशमुख यांनी दिली. वारणा डावा कालव्याचे काम सुरू आहे.ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी अडथळा निर्माण केलेला आहे .त्यावर शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याची ग्वाही देशमुख यांनी दिली.
वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांचे सर्व क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे नियोजन करा - सत्यजित देशमुख | Plan to bring all areas of Wakurde Budruk Yojana deprived of water under Olitha - Satyajit Deshmukh
यावेळी वारणा कालवे विभाग कार्यकारी अभियंता देवाप्पा शिंदे, प्रतापराव यादव, के.डी.पाटील, रणजित नाईक,सम्राट शिंदे, सहाय्यक अभियंता अनिल लांडगे, सहाय्यक अभियंता दीपक परळे, शाखा अभियंता व्ही.एम.पाटील उपस्थित होते.

0 Comments