BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पिसोरा , सशांची शिकार करणाऱ्या पाच जणांना अटक|Pisora and Five rabbit hunters arrested |

शिराळा:  पिशवीपैकी खोतवाडी ( ता . शाहूवाडी ) येथील मांडलाई पठार परिसरात पिसोरा ( गेळा ) व सशांची शिकार करणाऱ्या पाच जणांना वन विभागाच्या पथकाने सापळा लावून पकडले . त्यांच्याकडे शिकार केलेल्या दोन पिसोरा , दोन ससे , बंदुका , काडतुसे सापडली असून २६ मे रोजी  रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली . दरम्यान या पाचही संशयितांना येथील प्रथमवर्ग न्यायालयाने सोमवार ( ता . ३० ) पर्यंत कोठडी दिल्याची माहिती मलकापूर परिक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांनी दिली .

पिसोरा , सशांची शिकार करणाऱ्या पाच जणांना अटक|Pisora and   Five rabbit hunters arrested |

 दरम्यान  या घटनेतील अन्य दोघे फरारी झाले आहेत . प्रवीण विश्वास बोरगे ( २ ९ ) , बाजीराव बाबू बोरगे ( ४५ ) , मारुती पांडुरंग वरे ( ३० ) , संजय हिंदूराव भोसले ( ३३ ) , रामचंद्र बाबू बोरगे ( ३२ ) ( सर्व रा . वरेवाडी , ता शाहूवाडी ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत . आबाजी बाजीराव बोरगे व अमोल शिवाजी रवंदे हे दोघे पसार झाले आहेत .

पिसोरा , सशांची शिकार करणाऱ्या पाच जणांना अटक|Pisora and   Five rabbit hunters arrested |

 याबाबत वन विभागातून मिळालेली आधिक माहिती अशी खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंडलाई पठार परिसरात  गुरुवारी ( ता . २६ ) रात्री काहीजण शिकारीसाठी गेले होते . मिळालेल्या माहिती प्रमाणे वनविभागाच्या पथकाने मांडलाई पठारावर खोतवाडी ते कुंभारवाडी दरम्यान रात्री दहा पासून पाळत सुरू केली . त्यावेळी या परिसरातील हूलवाणी नावाच्या ठिकाणी रात्री बाराच्या सुमारास गोळीबार झाल्याचा आवाज आला.

पिसोरा , सशांची शिकार करणाऱ्या पाच जणांना अटक|Pisora and   Five rabbit hunters arrested |

 त्यानंतर साडेबाराच्या सुमारास दोन मोटारसायकल ( एमएच ०३ सीई ७ ९ ३ ९ व एम . एच . १४ बी . एन . ३२०४ ) प्रवीण बोरगे , बाजीराव बोरगे , मारुती वरे , संजय भोसले हे चौघेजण जात असलेचे दिसले . त्यांना वन विभागाच्या पथकाने अडवून तपासणी केली असता त्यांचेकडे मारलेले दोन पिसोरा व दोन ससे , तेरा जिवंत काडतुसे , ६ वापरलेली काडतुसे असा मुद्देमाल सापडला . पथकाने मुद्देमालासह त्यांना ताब्यात घेतले . त्यावेळी आबाजी बोरगे पसार झाला .

पिसोरा , सशांची शिकार करणाऱ्या पाच जणांना अटक|Pisora and   Five rabbit hunters arrested |

पिसोरा , सशांची शिकार करणाऱ्या पाच जणांना अटक|Pisora and   Five rabbit hunters arrested |

 दरम्यान  चौकशी चालू असताना दीडच्या सुमारास दुसऱ्या दुचाकी गाडीवरून रामचंद्र बाबू बोरगे व अमोल शिवाजी रवंदे मारलेल्या प्राण्याचे मांस घेऊन जात असलेचे दिसते . त्यांना थांबवताना पथकातील कर्मचाऱ्यांशी झटापट झाली . त्यात पाठीमागे बसलेला रामचंद बोरगे सापडला . पण अमोल रवंदे गाडीसह पसार झाला . सापडलेल्या तीन बंदुकांपैकी एक परवानाधारक तर दोन गावठी आहेत . 

पिसोरा , सशांची शिकार करणाऱ्या पाच जणांना अटक|Pisora and   Five rabbit hunters arrested |

या घटनेबाबत परिक्षेत्र अधिकारी अमित भोसले म्हणाले , " मारलेल्या प्राण्यासह मास मिळालेले आहे . हे मास सध्या सश्याचे असल्याचे प्रथम दर्शनी वाटते पण ते नेमक्या कोणत्या प्राण्याचे आहे ते फॉरेन्सिक तपासणीनंतर कळेल . पसार झालेल्या संशयितांचा शोध सुरू असून यामध्ये आणखी कितीजण सामिल आहेत याचाही तपास सुरू आहे . कारवाई पथकात सहायक वनसंरक्षक सुनील निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूरचे परिक्षेत्र अधिकारी अमित भोसले , वनरक्षक अक्षय चौगुले , रूपाली पाटील , विठ्ठल खराडे , दिग्वीजय पाटील , जालंदर कांबळे , आशिष पाटील , वनपाल मेहबूब नायकवडी , वनसेवक शंकर लवटे , रामचंद्र केसरे , बाबाजी पाटील आदींचा समावेश होता .

पिसोरा , सशांची शिकार करणाऱ्या पाच जणांना अटक|Pisora and   Five rabbit hunters arrested |

Post a Comment

0 Comments