BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बनावट नोटांच्या छपाई प्रकरणी एकास अटक ; एक फरार | One fugitive arrested in counterfeit note printing case

स्लामपूर:बनावट नोटा छपाई प्रकरणी सांगली येथे संशयित आरोपी श्रीधर बापू घाडगे रा. सोनार सिद्धनगर आटपाडी सध्या सांगली   यास पोलिसांनी अटक केली . त्याच्या कडून ६ , ९ ४,२५०  किंमतीच्या बनावट नोटा, छपाई करण्यासाठी वापरलेला प्रिंटर ,  छपाई करण्यासाठी वापरलेल्या खऱ्या भारतीय चलनी नोटा , नोटा कापण्याचे साहित्य , इतर साधन सामग्री पोलीसांनी जप्त केली.  त्यास न्यायालयात हजर केले असता  दहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.दुसरा साथीदाररमेश ईश्वर चव्हाण रा. आटपाडी  फरारी आहे.

बनावट नोटांच्या छपाई प्रकरणी एकास अटक ; एक फरार | One fugitive arrested in counterfeit note printing case

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आयसीआयसीआय बँकेच्य कॅश डिपॉझीट मशीनमध्ये ५०० रुपयांच्या ६ बनावट नोटा भरल्याप्रकरणी संग्राम सदाशिव सूर्यवंशी रा .कामेरी (ता वाळवा याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविणेत आला आहे.सदर गुन्हयाचा तपास करीत असताना संग्रामला विश्वासात घेतला  असता त्याच्या  सोबत कामेरी येथील  पिंटू निवृत्ती पाटील व  सूरेश नानासो पाटील रा. एखतपूर ता .सांगोला याचा सहभाग असलेचे निदर्शनास आले. त्यानुसार   सूरेश पाटील यास सांगोला व पिंटू  पाटील यास  कामेरी येथून ताब्यात घेतले.

बनावट नोटांच्या छपाई प्रकरणी एकास अटक ; एक फरार | One fugitive arrested in counterfeit note printing case

 त्यांच्याकडे चौकशी केली असता  मुख्य सुत्रधार श्रीधर बापू घाडगे रा. सोनार सिद्धनगर आटपाडी हा  बनावट नोटांची छपाई करीत असून त्याचेकडून कडून ५०० , २०० , १०० रुपये घेतल्याचे काबुल केले. त्या नुसार  श्रीधर घाडगे याची माहिती काढण्यात आली.  सायबर पोलीस ठाण्याकडून तांत्रिक माहिती घेऊन घाडगे याच्या  सांगलीतील  विजयनगर येथील भाडयाने राहत असले घराभोवती पोलीस पळत ठेवली. त्यावेळी श्रीधर घाडगे हा त्याच्या  टाटा इंडिगो कारमधून घाई गडबडीने जाताना मिळून आला.

बनावट नोटांच्या छपाई प्रकरणी एकास अटक ; एक फरार | One fugitive arrested in counterfeit note printing case

 त्या  कारमध्ये ६ , ९ ४,२५०  किंमतीच्या ५०० , २०० , १०० , ५० , २० रुपयेच्या बनावट नोटांचे बंडल मिलाळे . त्याच्या घराची झडती घेतली असता बनावट नोटांची छपाई करण्याचे साहित्य मिळून आले . नोटांची छपाई करण्यासाठी वापरलेला  ७२,००० रुपयेचा  प्रिंटर, ५०० , २०० , १०० रुपयेच्या  बनावट नोटा व त्या नोटांचे छपाई करण्यासाठी वापरलेल्या खऱ्या भारतीय चलनी नोटा , नोटा कापण्याचे साहित्य , इतर साधन सामुग्री  त्याने  एका पाण्याच्या  टाकी मध्ये लपवून ठेवली होती. त्याचा आणखीन एक साथीदार रमेश ईश्वर चव्हाण रा. आटपाडी याचा गुन्हयामध्ये सहभाग असून तो फरार  आहे. 

बनावट नोटांच्या छपाई प्रकरणी एकास अटक ; एक फरार | One fugitive arrested in counterfeit note printing case

सदर कारवाई सपोनि अनिल जाधव , सपोफौ. महापूरे , पो.ना. माळी ,  कानडे ,  बावडेकर , प्रशांत देसाई , अमोल सावंत , गणेश शेळके, सुरज जगदाळे ,कौस्तूच पाटील यांनी केली. त्यांना  सायबर  पोलीस  ठाण्याचे  विवेक साळुंखे यांनी योग्य मदत केली आहे . 

बनावट नोटांच्या छपाई प्रकरणी एकास अटक ; एक फरार | One fugitive arrested in counterfeit note printing case

Post a Comment

0 Comments