BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विवाहितेची आत्महत्या | Marital suicide

 विवाहितेची आत्महत्या | Marital suicide


 विवाहितेची आत्महत्या | Marital suicide

 

 विवाहितेची आत्महत्या | Marital suicide


 विवाहितेची आत्महत्या | Marital suicide

     माणिकवाडी (ता.वाळवा)  येथील नवविवाहिता हर्षदा सागर आटकेकर (वय - २२) हिने सासरच्या छळास कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. याबाबत  वडील नामदेव रामचंद्र शिंदे रा.मांगरूळ यांनी कोकरूड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

 विवाहितेची आत्महत्या | Marital suicide

 

     पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मांगरूळ (ता. शिराळा)  येथील नामदेव रामचंद्र शिंदे यांच्या हर्षदा या मुलीचा विवाह २१ फेब्रुवारी २०२२ रोजी माणिकवाडी  येथील सागर जगन्नाथ आटकेकर याच्याशी झाला होता. सागर हा सैन्यदलात नोकरीस असून तो सध्या जम्मू काश्मीर येथे आहे. पती सागर जगन्नाथ आटकेकर, सासू कमल जगन्नाथ आटकेकर, दीर जयदीप जगन्नाथ आटकेकर (रा.माणिकवाडी) व नणंद सोनाली (रा.केदारवाडी ) यांनी हर्षदा हिचा मानसिक, शारीरिक छळ सुरु केला होता.  पती सागर तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. सागरचे एका मुलीशी प्रेम संबंध असल्याचे हर्षदास समजले होते.

 विवाहितेची आत्महत्या | Marital suicide

 विवाहितेची आत्महत्या | Marital suicide

 त्यामुळे पती व घरचे लोक हर्षदास सातत्याने त्रास देत होते. मुलीला होत असलेला रोजच्या त्रासामुळे आई-वडिल मयत हर्षदास २९ एप्रिल रोजी (मांगरुळ) माहेरी  घेऊन आले होते. माहेरी आलेपासून ती उदासीन होती. मनावरील सातत्याच्या दडपणाने तिने वाईट वाटून घेऊन २ मे रोजी विषारी औषध प्राशन केले. उपचारासाठी तीला कोकरूड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.

 विवाहितेची आत्महत्या | Marital suicide

 

      आत्महत्येस प्रवृत्त केले बद्द्ल तिच्या वडिलांनी पती सागर,सासू कमल ,दीर जयदीप (रा.माणिकवाडी) ता. वाळवा व नणंद सोनाली (रा.केदारवाडी ) या चौघांच्या विरोधात कोकरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.अधीक तपास सपोनि ज्ञानदेव वाघ करीत आहेत.

 विवाहितेची आत्महत्या | Marital suicide

यशराज ॲग्रो प्रथम वर्धापनदिन व ग्राहक मेळावा 

 



Post a Comment

0 Comments