केवड्याचा उपयोग अत्तर, लोशन, तंबाखू, अगरबत्ती इत्यादी वस्तूंमध्ये सुगंधासाठी करण्यात येतो. तसंच केवड्यापासून पत्त्यांची चटई, टोप, पातेली इत्यादी गोष्टीही बनवण्यात येतात. केवडा प्रत्येक स्वरूपात उपयुक्त असतो. केवडा हा अनेक आजारांवरही फायदेशीर आहे.
वैशिष्ट्य म्हणजे केवड्याच्या तेलाने मालिश केल्यास, तुमच्या शरीरामध्ये असलेल्या गाठी संपुष्टात येतात. केवड्याला अनेक नावं आहेत. केवड्याला गंधपुष्प, धूतिपुष्पिका, केंदा, केऊर, गोजंगी, केवर, नृपप्रिया इत्यादी अनेक नावांनी ओळखलं जातं.
ओडिसामध्ये केवड्याला फुलांचा राजा संबोधण्यात येतं. केवड्याचं झाड हे 18 फूट वाढतं आणि एका वेळी यावर 30 ते 40 फळं उगवतात. याचं फळ सुरुवातीला पांढऱ्या रंगाचं असतं आणि त्यामुळे त्याला सफेद कमळ असंही म्हटलं जातं.
0 Comments