ओळख फुलांची भाग ६ (बहावा) | Introduction Flowers Part 6 (Bahawa)
ओळख फुलांची भाग ६ (बहावा) | Introduction Flowers Part 6 (Bahawa)
ओळख फुलांची भाग ६ (बहावा) | Introduction Flowers Part 6 (Bahawa)
ओळख फुलांची भाग ६ (बहावा) | Introduction Flowers Part 6 (Bahawa)
अमरकोशात राजवृक्ष आणि सुवर्णक म्हणून वाखाणलेल्या ’आरग्वध’ वृक्षाचं मराठी नाव कित्ती साधं आणि सुंदर आहे, "बहावा"! अगदी हिमालयापासून थेट कन्याकुमारीपर्यंत मिळणारं हे झाड अगदी १००% भारतीय आहे. ऋग्वेदात म्हटल्याप्रमाणे 'कर्णिकार' आणि 'कृतमाल', म्हणजे कानात घालता येणारा अलंकार! असा बहावा फुललेला पाहाणं म्हणजे नेत्रसुखच आहे.
ओळख फुलांची भाग ६ (बहावा) | Introduction Flowers Part 6 (Bahawa)
महाराष्ट्रात आपल्या पानझडी जंगलामधे हे झाड खूप आढळतं. इतर वेळेस ह्या झाडाच अस्तित्व सामान्य असतं, पण उन्हाळ्यात याची ’कळी खुलते’ शोभिवंत फुलोऱ्यासाठी परिचित असलेला एक बहुवर्षायू वृक्ष. बाहवा हा पानझडी वृक्ष फॅबेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव कॅसिया फिस्चुला आहे. ‘फिस्चुला’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ मराठीत ‘नळी’ असा होतो. बाहवा वृक्षाची शेंग नळीसारखी असल्यामुळे त्याच्या शास्त्रीय नावात ‘फिस्चुला’ ही संज्ञा आली आहे. बाहवा वृक्ष मूळचा दक्षिण आशियातील असून विशेषेकरून भारत, पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका इ. देशांतील आहे. अनेक देशांत या वृक्षाची मुद्दाम लागवड शोभेकरिता केली जाते. भारतात तो जवळजवळ सर्वत्र आढळतो.
ओळख फुलांची भाग ६ (बहावा) | Introduction Flowers Part 6 (Bahawa)
बाहवा हा मध्यम आकाराचा वृक्ष १०–२० मी. उंच वाढतो. खोडाची साल खडबडीत असते. फांद्यांचा रंग फिका व पिवळसर करडा असतो. पाने संयुक्त, मोठी व समदली पिसांसारखी असतात. दलांच्या म्हणजे पर्णिकांच्या ४–८ जोड्या असतात. पानगळ झाल्यावर उन्हाळ्यात भरभरून फुलतो तेव्हा हा वृक्ष उठून दिसतो. त्याच वेळी कोवळी पालवी येण्यास सुरुवात होते. मार्च-जूनमध्ये पिवळ्या धमक फुलांचे मोठे फुलोरे माळांसारखे खाली लोंबताना दिसतात. या फुलांवरून त्याचे इंग्रजीतील हे नाव गोल्डन शॉवर पडले आहे.
ओळख फुलांची भाग ६ (बहावा) | Introduction Flowers Part 6 (Bahawa)
0 Comments