ओळख फुलांची भाग ५ (कमळ ) | Introduction Flowers Part 5 (Lotus)
राक्तिम लालीसम लाल,,, क्षीरसम शुभ्र फुल,,,,, देवाधिकांनाही पडते याच्या सौन्दर्याची भूल,,,,, ब्रम्हा, विष्णू, लक्ष्मी,असो की सरस्वती,,,, सर्वांनाच हा हवा भोवती,,,,, चिखलात वाढतो,,, पाण्यात राहतो,, पण ह्या दोन्ही पासून सदा अलिप्त असतो,,,,, कवी,लेखक,असो की चित्रकार,,,,, यांचे ही याच्यावर प्रेम अपार,,,,, औषधी गुणांनी युक्त हा नीरज,,,,, भुंग्यासही आकर्षित करतो हा अंबुज,,,, जगात सर्वत्र याचा लौकिक,,,, देशाचे राष्टीय फुल हे अलौकिक,,,,,
ओळख फुलांची भाग ५ (कमळ ) | Introduction Flowers Part 5 (Lotus)
ओळख फुलांची भाग ५ (कमळ ) | Introduction Flowers Part 5 (Lotus)
कमळ ह्या वनस्पतीचे फूल भारत आणि व्हिएटनाम या देशांचे राष्ट्रीय फूल आहे. ही सुंदर, बळकट जलवनस्पती निंफिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव निलंबो न्युसीफेरा असे आहे. जगभर या वनस्पतीच्या सु. १०० जाती आढळतात. ही वनस्पती मूळची चीन, जपान व भारत या देशांतील असावी; हिचा प्रसार भारतात सर्वत्र व इराणपासून पूर्वेस ऑस्ट्रेलियापर्यंत आहे.
ओळख फुलांची भाग ५ (कमळ ) | Introduction Flowers Part 5 (Lotus)
कमळ सामान्यत: गोड्या व उथळ पाण्यात वाढते आणि १-१.५ मी. उंच तर समस्तरीय ३ मी. पर्यंत पसरते. खोड (मूलक्षोड) लांब असून पाण्याच्या तळाशी जमिनीवर सरपटत वाढते, तर पाने पाण्यावर तरंगतात. पाने मोठी, वर्तुळाकार व छत्राकृती असून ६०- ९० सेंमी. व्यासाची असतात. देठ लांब असतो. पानांवरील शिरा पानाच्या मध्यापासून किरणांप्रमाणे पसरलेल्या असतात. कमळाचे फूल सुंदर, सुंगधी व मोठे असून साधारणत: १५-२० सेंमी. व्यासाचे असते. फुले पाण्यावर तरंगतात. फुलांचा रंग त्यांच्या जातीनुसार वेगवेगळा असतो. फुले जुलै-ऑक्टोबरमध्ये येतात. या वनस्पतीच्या लागवडीकरिता बिया व गड्डे (मूलक्षोड) वापरतात.
ओळख फुलांची भाग ५ (कमळ ) | Introduction Flowers Part 5 (Lotus)
0 Comments