आकांक्षा पाटील यांना आयडियल अँकर पुरस्कार जाहीर | Ideal Anchor Award announced to Akanksha Patil
आकांक्षा पाटील यांना आयडियल अँकर पुरस्कार जाहीर | Ideal Anchor Award announced to Akanksha Patil
आकांक्षा पाटील यांना आयडियल अँकर पुरस्कार जाहीर | Ideal Anchor Award announced to Akanksha Patil
शिराळा: बावची (ता. वाळवा) येथील आकांक्षा दिपक पाटील यांना राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचा आयडियल अँकर पुरस्कार जाहीर झाला आहे.
आकांक्षा पाटील यांना आयडियल अँकर पुरस्कार जाहीर | Ideal Anchor Award announced to Akanksha Patil
आकांक्षा पाटील यांनी कमी वयात वक्तृत्व क्षेत्रात यश संपादित केले आहे. विविध स्पर्धांमध्ये त्यांनी मोठा नावलौकिक कमाविला आहे. त्यांच्या वक्तृत्व कलेचं खासदार धैर्यशील माने, जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झुंझारराव पाटील यांनी कौतुक केले आहे. विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन ही त्यांनी केले आहे. ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून त्यांनी ग्रामीण भागातील मुला मुलींच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला आहे.
आकांक्षा पाटील यांना आयडियल अँकर पुरस्कार जाहीर | Ideal Anchor Award announced to Akanksha Patil
गेली दोन वर्ष त्या स्वराज्य मराठी न्यूज चॅनेल मध्ये निवेदिका म्हणून काम पाहत आहेत. ग्रुप ऑफ मीडियामध्ये महिला विभागाच्या प्रतिनिधी म्हणूनही त्या जबाबदारी पार पाडत आहेत. ग्रामीण भागातील मुले वक्तृत्वाकडे वळावित यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील राहिल्या आहेत. विविध सेवा संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे. शालेय शिक्षण सुरू असताना त्यांनी वक्तृत्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या या कार्याचा विचार करून राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानने आयडियल अँकर पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे.
आकांक्षा पाटील यांना आयडियल अँकर पुरस्कार जाहीर | Ideal Anchor Award announced to Akanksha Patil
जून महिन्यात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, औद्योगिक, कृषी, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना आयडियल अँकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बावची परिसरातील विविध मंडळांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
आकांक्षा पाटील यांना आयडियल अँकर पुरस्कार जाहीर | Ideal Anchor Award announced to Akanksha Patil
मीडिया क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे आपणाला हे यश मिळाले आहे. वक्तृत्व क्षेत्रात करिअर करण्याची मनीषा आहे.
आकांक्षा पाटील
आकांक्षा पाटील यांना आयडियल अँकर पुरस्कार जाहीर | Ideal Anchor Award announced to Akanksha Patil
0 Comments