एकाच योजनेचे किती वेळा पाणी पूजन करणार-सत्यजित देशमुख | How many times will water worship of the same scheme-Satyajit Deshmukh

शिराळा:चांदोली धरणाची निर्मिती स्व. शिवाजीराव देशमुख यांनी केली. खऱ्या अर्थाने तेच "पाणीदार" नेते आहेत. कालपर्यंत वाकुर्डे योजनेचे शिल्पकार म्हणून एकमेकांवर आगपाखड करणारी मंडळी पाणी पूजन एकत्र करत आहेत .या योजनेचे नेमके किती वेळा पाणी पूजन करणार ? हा प्रश्न असून तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांना पाणी देण्यासाठीचे नियोजन काय ? याचे उत्तर या मंडळींकडे नाही. निव्वळ लोकांना फसवण्याचे काम सुरू केले असल्याची टीका सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांनी केली.
एकाच योजनेचे किती वेळा पाणी पूजन करणार-सत्यजित देशमुख | How many times will water worship of the same scheme-Satyajit Deshmukh
एकाच योजनेचे किती वेळा पाणी पूजन करणार-सत्यजित देशमुख | How many times will water worship of the same scheme-Satyajit Deshmukh
वाकुर्डे बुद्रुक (ता. शिराळा) येथील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यावेळी बोलत होते. स्व.शिवाजीराव देशमुख सेवा केंद्र व सत्यजित देशमुख जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.
एकाच योजनेचे किती वेळा पाणी पूजन करणार-सत्यजित देशमुख | How many times will water worship of the same scheme-Satyajit Deshmukh
एकाच योजनेचे किती वेळा पाणी पूजन करणार-सत्यजित देशमुख | How many times will water worship of the same scheme-Satyajit Deshmukh
जिल्हा परीषद सदस्य संपतराव देशमुख, माजी सभापती हणमंतराव पाटील, रणजित नाईक, प्रतापराव यादव, के.डी.पाटील,सम्राट शिंदे,माजी सभापती शारदाताई घारगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
एकाच योजनेचे किती वेळा पाणी पूजन करणार-सत्यजित देशमुख | How many times will water worship of the same scheme-Satyajit Deshmukh
यावेळी देशमुख म्हणाले, तालुक्यामध्ये चांदोली धरण बांधण्यासह करमजाई, हात्तेगाव,गिरजवडे,टाकवे तलाव उभारण्याचे काम देशमुख यांनी केले. मोरणा धरण बाधले. यामुळे या विभागातील गावांना, शेतकऱ्यांना याचा निश्चित फायदा झाला. विधानसभा मतदारसंघातील पाचवी,सातवी पास नापास असणाऱ्या मुलांना पोलीस दलात भरती करण्याची धमक फक्त शिवाजीराव देशमुख यांच्यात होती. वाकुर्डेच्या नावाखाली निव्वळ राजकारण आजपर्यंत करण्यात ही मंडळी एकत्र येत पाणी पूजन केले. पाण्यापासून वंचित गावांना पाणी देण्याचे धोरण या मंडळीकडे नाही.
एकाच योजनेचे किती वेळा पाणी पूजन करणार-सत्यजित देशमुख | How many times will water worship of the same scheme-Satyajit Deshmukh
एकाच योजनेचे किती वेळा पाणी पूजन करणार-सत्यजित देशमुख | How many times will water worship of the same scheme-Satyajit Deshmukh
शेतकऱ्यावर निव्वळ अन्याय करण्याचे काम सुरू आहे. शेतीला पाणी नाही, विज नाही, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सामुग्र अनुदान नाही. अशा अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर दिवसेंदिवस वाढत आहेत. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी होत आहे. परंतु या वरती एक शब्दही मंडळी काढत नाही. उलट विज बिल भरण्यासाठी वारंवार तगादा करून विजेची तोडणी केली जात आहे.
एकाच योजनेचे किती वेळा पाणी पूजन करणार-सत्यजित देशमुख | How many times will water worship of the same scheme-Satyajit Deshmukh
आपली संघटना एवढी ताकदवान आहे की आज दोन गटांना एकत्र यावे लागले. निश्चितपणे या दोघांना आपल्या सांघिकतेची जाणीव आहे. विरोधकांची एकत्रीकरण हे निव्वळ सोंग असून संधीसाधू लोकांचा खेळ सुरू आहे. हे लोकांनी ओळखलेले आहेत. निश्चितपणे लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील.
एकाच योजनेचे किती वेळा पाणी पूजन करणार-सत्यजित देशमुख | How many times will water worship of the same scheme-Satyajit Deshmukh
एकाच योजनेचे किती वेळा पाणी पूजन करणार-सत्यजित देशमुख | How many times will water worship of the same scheme-Satyajit Deshmukh
यावेळी रणजीतसिह नाईक म्हणाले, स्व.विश्वासराव नाईक यांनी स्व. देशमुख यांना राजकीय मोठी ताकद आणि मदत करण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्याची जाणीव स्वर्गीय देशमुख यांनी देखील कायम ठेवली .कायम आमच्या कुटुंबियांवर प्रेम केले. यापुढील काळात आमच्या दोन्ही घरातील जिव्हाळा आणि प्रेम कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
एकाच योजनेचे किती वेळा पाणी पूजन करणार-सत्यजित देशमुख | How many times will water worship of the same scheme-Satyajit Deshmukh
यावेळी सोमनाथ माने, शंकर माने, संतोष माने,दत्तात्रय माने, बाळासो माने,शंकर माने, सागर माने, अशोक शिंदे, सचिन माने,सुनील माने, संतोष माने, आनंदा माने,योगेश माने, सुरेश माने, यांच्यासह अनेक कार्यकर्ते, महिला यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.
एकाच योजनेचे किती वेळा पाणी पूजन करणार-सत्यजित देशमुख | How many times will water worship of the same scheme-Satyajit Deshmukh
यावेळी प्रदीप कदम, जगन्नाथ माने, वसंत शेटके, गुंगा शेटके, अशोक माने, सचिन वाघ, भिमराव वाघ, सुनील जाधव, हरीश पाटील, रणजीत कदम, संभाजीराव नलवडे, मोहन माने, तात्यासो धुमाळ, संगीताताई शेटके, तानाजी जाधव उपस्थित होते.

0 Comments