शेतकरी पाण्यासाठी तीव्र लढा उभारतील - डॉ. भारत पाटणकर| Farmers will fight hard for water - Dr. Bharat Patankar
शेतकरी पाण्यासाठी तीव्र लढा उभारतील - डॉ. भारत पाटणकर| Farmers will fight hard for water - Dr. Bharat Patankar
शिराळा तालुक्यातील पाणी चळवळ गतिमान करून शेतकरी व दिवंगत पत्रकार मोहन मस्कर पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रसंगी श्रमिक मुक्तीदल व या विभागातील शेतकरी तीव्र लढा उभारतील असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यानी केले.
शेतकरी पाण्यासाठी तीव्र लढा उभारतील - डॉ. भारत पाटणकर| Farmers will fight hard for water - Dr. Bharat Patankar
चिंचेवाडी. ता. शिराळा येथे पत्रकार मोहन मस्कर पाटील यांचे जयंती निमित्त पाणी चळवळ बैठकीत बोलत होते .यावेळी शिराळा पंचायत समिती चे माजी सभापती हणमंतराव पाटील अध्यक्षस्थानी होते .तर श्रमिक मुक्ती दलाचे राज्य सदस्य वसंत पाटील ,चैतन्य दळवी पाणी वापरचे चेअरमन विष्णू पाटील, मानसिंग पाटील ,आनंदराव पाटील, सरपंच विजय पाटील ,सखाराम पाटील, शंकर पाटील, हरिभाऊ पाटील प्रमुख उपस्थित होते.
शेतकरी पाण्यासाठी तीव्र लढा उभारतील - डॉ. भारत पाटणकर| Farmers will fight hard for water - Dr. Bharat Patankar
डॉ. पाटणकर म्हणाले,शिराळा पश्चिम भागातील वंचित गावे,वाड्यावस्त्यातील शेतीला उपसा सिंचन योजना मंजूर असून त्या सरकारी खर्चाने पूर्ण करणे, कालव्यांचे गळती व गेट दुरस्ती कामे पूर्ण करणे.बरोबरच दोन हजार सोळा साली पायलट प्रकल्प म्हणून संपूर्ण शिराळा तालुका ठिबक सिंचनखाली मंजूर असून २४ पासून मणदुर येथून जलसंपदा विभागचे अधिकारी ,श्रमुदचे प्रतिँनिधी व पाणीवापर संस्थांचे पदाधिकारी यांचेसहभागातून ठिबकसिंचन योजनेचा सर्वे सुरू झाला आहे.सदर काम व पाणीवापर संस्था पुन्हा गावाच्या ताब्यात पाणी वितरण व्यवस्था गतिमान करण्यासाठी शेतकरी व श्रमिक मुक्तीदल यापुढे अधिक जोमाने काम करणार आहे.
शेतकरी पाण्यासाठी तीव्र लढा उभारतील - डॉ. भारत पाटणकर| Farmers will fight hard for water - Dr. Bharat Patankar
येत्या ६ जून रोजी जलसंपदा अधिकारी सोबत वारणावती येथे पाणीवापर संस्था, गळती दुरुस्ती ,ठिबकसिंचन व उपसा योजना संदर्भात ठोस निर्णय घेतला जाईल असे सांगून शेतकरी व दिवंगत पत्रकार मोहन मस्कर पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार असल्याचे सांगितले. यावेळी माजी सभापती हणमंतराव पाटील, श्रमिक मुक्ती दलाचे राज्य सदस्य वसंत पाटील, आनंदराव पाटील याची भाषणे झाली.
शेतकरी पाण्यासाठी तीव्र लढा उभारतील - डॉ. भारत पाटणकर| Farmers will fight hard for water - Dr. Bharat Patankar
शेतकरी पाण्यासाठी तीव्र लढा उभारतील - डॉ. भारत पाटणकर| Farmers will fight hard for water - Dr. Bharat Patankar
या बैठकीस चिंचवाडी, काळुंद्रे,पणुब्रे वारुण, आरळा ,मणदुर किनरेवाडी,कदमवाडी, करुंगली गावातील शेतकरी,महिला व पाणीवापरसंस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते. टी. जी. किनरे यानी आभार मानले.
शेतकरी पाण्यासाठी तीव्र लढा उभारतील - डॉ. भारत पाटणकर| Farmers will fight hard for water - Dr. Bharat Patankar
0 Comments