शिराळा, ता.१०: शेतकऱ्यांनी आपली बँक म्हणून सांगली जिल्हा बँकेकडे व्यवहार करावेत असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
कासेगाव (ता.वाळवा) येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कासेगाव शाखेचा ५८ वा वर्धापनदिन व ए.टी. एम. सेवेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील तात्या होते. यावेळी राजारामबापू बँकेचे उपाध्यक्ष जनार्दन पाटील काका ,सांगली जिल्हापरिषदचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, राजारामबापू दुध संघ संचालक उदयसिंह पाटील ,सरपंच किरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नाईक म्हणाले, आजचे जग हे आधुनिकीकरणाचे जग आहे. युवापिढी याचा जास्त वापर करत आहेत. बँकेने शेतकऱ्यांना कमी व्याजात कर्ज देण्याचे प्रयत्न केले आहेत. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांनी आपली बँक म्हणून या बँकेकडे व्यवहार करावेत. सोसायट्यानी आपला व्यवसाय वाढवून लोकांना जास्ती जास्त मदत करण्याचा प्रयत्न करावा.
दिलीप पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या हिताचे बँकेने नेहमीच निर्णय घेतले आहेत.मंत्री जयंतराव पाटील यांच्यामुळे मला जास्तकाळ बँकेचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सर्वांनी ए.टी. एम.चा वापर करावा. पेपरलेस बँकिंग ही संकल्पना पुढे येऊ लागली आहे. राष्ट्रीयकृत बँका प्रमाणे आपले कामकाज करण्याचे धोरण आहे. आगामी काळात बँकेचे अँप येईल.
देवराज पाटील म्हणाले,जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची अर्थ वाहिनी आहे. राष्ट्रीयीकृत बँकांची सेवा मिळत नाही.कर्ज फेडायला वेळ लागत नाही तेवढा वेळ ना हरकत दाखला मिळवायला लागतो. या बँकेचे सोसायटीना चांगले सहकार्य आहे.
प्रारंभी सभासदांना ए.टी. एम.चे वितरण करण्यात आले. अशोकराव माने यांनी स्वागत व प्रास्तविक केले. उपसरपंच दाजी गावडे, पश्चिम भाग सोसायटीचे अध्यक्ष मोहन पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र कदम, पूर्व भाग सेवा सोसायटीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील, सोमेश्वरी पाणी पुरवठा उपाध्यक्ष अण्णा माने, बजार समिती संचालक सुरेश गावडे,शेणे सेवा सोसायटीचे अध्यक्ष संजय पाटील, मुख्य कार्यालय प्रशासन अधिकारी अशोकराव माने, विभागीय अधिकारी वाळवा के.एस. शिंदे, विशेष वसुली अधिकारी व्ही..व्ही.पाटील, आय.टी. अधिकारी आर.एस. साजणे, शाखाधिकारी व्ही..व्ही. लिधडे, फिल्ड अधिकारी पी.आर.खोत, वसुली अधिकारी विकास पाटील उपस्थित होते. के.एस.शिंदे यांनी आभार मानले.
0 Comments