शिराळा : चरण ता.शिराळा येथे जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी व कार्याध्यक्ष आशा साळुंखे यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू ऑपरेशन शिबिरात ६७ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या शिबिरात २८ रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी निवड करण्यात आली. सर्व रुग्णांची नेत्र तपासणी हिरकणी ग्रूपच्या अध्यक्ष नेत्र चिकित्सा अधिकारी सविता नलवडे यांनी केली. सदर शिबिरास ग्रूपच्या उपाध्यक्ष प्रज्ञा चरणकर, प्रा. आ. केन्द्र चरण येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वसीम जमादार व इतर कर्मचारी उपस्थित होते.
जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी व कार्याध्यक्षा आशा साळुंखे यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या शिबिराचे आयोजन करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून सामाजिक हित जोपासण्याचा प्रयत्न केला.
0 Comments