चव्हाणवाडी येथील प्रणाली पाटील हिचा मृत्यू | Death of Pranali Patil at Chavanwadi
शिराळा: चव्हाणवाडी (ता. शिराळा ) येथील प्रणाली संजय पाटील ( वय २० ) हिचा गावातील सार्वजनिक आडामध्ये बुडून मृत्यू झाला.
याबाबत कोकरूड पोलीसात चंदन दगडू पाटील यांनी फिर्याद दिली आहे. कोकरूड पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, प्रणाली ही सोमवार 16 मे रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घरात कोणाला काही ही न सांगता निघून गेली होती.
तिला लहानपणापासून पोटाचा त्रास असल्याने ती नेहमी आजारी असायची. तिला यासाठी औषधोपचार सुरु होता. परंतु दुखणे कमी होत नसल्याने तीने आजाराला कंटाळली होती. बुधवारी सकाळी ७ वाजता गावातील सार्वजनिक आडामध्ये ती पाण्यात बुडून मृत झाल्याचे आढळून आली. पुढील तपास पोलीस नाईक शिवाजी जाधव करीत आहेत.
0 Comments