इस्लामपूर,आष्टयासह वाळवा तालुक्या तील बेवारस,अपघातग्रस्त आणि आजारी कुत्री व त्यांच्या पिल्लांच्यावर औषधोपचार करून त्यांचे पालनपोषण करण्यासाठी युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून 'सारथी ऍनिमल रेस्क्यू सेंटर' राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावर व्हीआयपी गेस्ट हाऊससमोर सुरू करण्यात आले आहे. प्रतिकदादा पाटील यांचे लहान मुले आणि प्राणिमात्रावर खूप प्रेम आहे. त्यांच्या या कनवाळूपणाच्या भावनेतूनच हे सेंटर सुरू करण्यात आले आहे.
प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते या सेंटरचे उदघाटन करण्यात आले. यावेळी युवा उद्योजक स्वप्निल विकास कर्डिले,शुभम सर्जेराव यादव,तसेच पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन वंजारी, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे जनरल मॅनेंजर एस.डी.कोरडे,सिव्हिल इंजिनिअर प्रेमनाथ कमलाकर,चीफ अकौंटंट अमोल पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कासेगावच्या धनश्री माने यांनी कुत्र्याची तीन अनाथ पिल्ले प्रतिकदादा पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. तसेच राजाराम सॉलव्हेक्सच्या परिसरात फिरणारी ४ अनाथ पिल्लेही आणली आहेत.
प्रतिकदादा पाटील म्हणाले,मी माझ्या वाढदिवसानिमित्त बेवारस,अपघातग्रस्त आणि आजारी प्राण्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा संकल्प केला होता. तो आज पूर्ण होत असल्याचा मला मनस्वी आनंद आहे. वाळवा तालुक्यातील अनाथ,आजारी व अपघातग्रस्त कुत्री आणि पिल्ले 'सारथी'मध्ये आणून द्यावीत. येथे त्यांच्यावर डॉ.सचिन वंजारी उपचार करतील. त्यांना खाऊ-पिऊ घालून त्यांची प्रकृती सुदृढ केली जाईल. त्यानंतर जर कोणी त्यांना सांभाळण्याची तयारी दाखविली,तर त्यांच्याकडे ही पिल्ले सुपूर्द केली जातील. भूतदया,माणुसकीच्या भावनेतून आम्ही हे सेंटर सुरू करीत आहोत. लोक आम्हास पूर्ण सहकार्य करतील.
यावेळी दिपक पाटील,राजेंद्र पाटील, संजय पडळकर,एल.जी.माने,के.एस. कुंभार,एस.आर.एकुंडे,धिरज भोसले,संदीप घनवट यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments