शिराळा: वाकुर्डेच्या या पाणी पूजन कार्यक्रमाला मानसिंगराव नाईक यांनी १३ भोंगे लावले आहेत. हे विकासाचे भोंगे आहेत. महाराष्ट्रात हेच विकासचे भोंगे चालवणे ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. भाजप देशात धर्माधर्मात अंतर निर्माण करणारे भोंगे लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी व्यक्त केले.
रेठरे धरण (ता.वाळवा) येथे वाकुर्डे योजनेच्या बंदिस्त पाईप लाईनच्या पाण्याच्या पूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी मंत्री पाटील म्हणाले, वाकुर्डेच्या पाण्याचे डोंगरी भागास वरदान मिळाले आहे. या भागातील लोकांची ४० वर्षाची स्वप्न्पुर्ती होत आहे. हा क्षण माझ्या आयुष्यातील अमुल्य ठेवा आहे.अडीच वर्षात वाकुर्डे व वारणा प्रकल्पासाठी ६०० कोटी निधी दिला आहे. ही योजना चालवायला शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. या योजनेला वन विभागाचे कमीत कमी अडथळे व्हावेत.
हे ही वाचा-एकाच योजनेचे किती वेळा पाणी पूजन करणार-सत्यजित देशमुख
आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, जयंतराव पाटील जलसंपदा मंत्री झाल्यानंतर या परिसरातील शेतकऱ्यांनी योजनेच्या पूर्णत्वासाठी घातलेल्या साद त्यांनी चागला प्रतिसाद दिला. या योजनेचे काम पाच वर्षात पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. या कामासाठी लागेल तो निधी उपलब्ध केला. शिरशी,कोंडाईवाडी, पणुंब्रे येथील कामाचे टेंडर काढले आहे.
माजी आमदार शिवाजीराव म्हणाले,शिराळा व वाळवा तालुक्यातील ११० गावातील ७० हजार एकराला पाणी मिळणार आहे. त्यामुळे या परिसराचा कायापालट होईल. या पुढील काळात पाटबंधारे विभाग व वाकुर्डे बुद्रुक योजना अशी पाणी पट्टी भरावी लागणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. जयंतराव आता वाकुर्डेचे पाणी आणलय आता महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी आमची साथ आहे.
स्वागत व प्रास्ताविक हर्षवर्धन पाटील यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष विराज नाईक,रविंद्र बर्डे, रणधीर नाईक, सुखदेव पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, भुषण नाईक शहाजी पाटील, विजय पाटील, बाळासाहेब पाटील, सुश्मिता जाधव, देवराज पाटील,संजय पाटील, सुनिता देशमाने,प्रांताधिकारी संपत खिल्लारी , जलसंपदा विभाग पुणेचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे उपस्थित होते. विजयराव नलवडे यांनी आभार मानले.
भाजपच्या जोखडातून शिवाजीराव सुटले
आग्र्याहून औरंगजेबच्या जोखडातून शिवाजी महाराज सुटले, त्या प्रमाणेच भाजपच्या जोखडातून हे आमचे शिवजीराव सुटले असे मंत्री पाटील म्हणताच सर्वत्र हश्या पिकला.
हा त्यांचा बालीशपणा
काहीजण पत्रकार परिषद घेवून वाकुर्डे चे पाणी वाळवा तालुक्यात पळवून नेले म्हणतात यावरून सत्यजित देशमुख यांच्या कार्यकर्त्याचा बालीशपणा दिसून येत असल्याची टीका आमदार नाईक यांनी केली.
भाजपचा देशात धर्माधर्मात अंतर निर्माण करणारे भोंगे लावण्याचा प्रयत्न | BJP's attempt to create horns that create a gap between religions in the country
0 Comments