BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वन्यप्राणी गणनेत बिबट्यासह ३०८ श्वापदांची नोंद | 308 animals including leopard recorded in wildlife census

 शिराळा: बौद्ध पौर्णिमेनिमित्त सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घेतलेल्या निसर्गानुभव कार्यक्रमांतर्गत पार पडलेल्या वन्यजीव गणनेत एका बिबट्यासह ३०८ श्वापदांची नोंद झाली आहे . 

वन्यप्राणी गणनेत बिबट्यासह ३०८ श्वापदांची नोंद | 308 animals including leopard recorded in wildlife census
 
दर  वर्षी बौद्ध पौर्णिमेला प्राणी गणना होत असते. गतवर्षी कोरोनामुळे बुद्ध पौर्णिमेला वन्य प्राणी गणना करू नका , अशा सूचना वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव ) नितीन काकोडकर दिल्याने  वन्यगणना रद्द झाली होती .  त्यापूर्वी २०२० मधील बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना झाली होती .त्या वेळी वन विभागांतर कॅमेरा ट्रैपिंग आणि अन्य तंत्रज्ञानाने वन्यजीव गणना झाली होती . त्यात लोकसहभाग वाढवला होता . 

वन्यप्राणी गणनेत बिबट्यासह ३०८ श्वापदांची नोंद | 308 animals including leopard recorded in wildlife census

वन्यप्राणी गणनेत बिबट्यासह ३०८ श्वापदांची नोंद | 308 animals including leopard recorded in wildlife census

याही वर्षी तसा सहभाग होता . वन्य प्राण्यांसह जंगल व वन्य प्राण्यांविषयी जागरूकता व्हावी , यासाठी वन्यजीव गणनेत लोकसहभाग वाढवला जात आहे . व्याघ्र प्रकल्पात उदमांजरसह राज्य प्राणी शेकरू , मोर , अस्वल यांच्या अस्तित्वाची नोंद झाल्या आहेत. व्याघ्र प्रकल्पाच्या ढेबेवाडी , हेळवाक , चांदोली , कोयना , बामणोली या पाच वनपरिक्षेत्रात एकूण ५४ मचाणांवर निसर्गानुभव कार्यक्रमांतर्गत पाणवठ्यावरील वन्य प्राणी गणना पार पडली .

 या वन्यप्राणी गणनेत बिबट्यासह १५ वन्यप्रजातीचे दर्शन निसर्गप्रेमींना घडले . प्रगणकांकडून भरून घेण्यात आलेल्या वन्य प्राणी गणनेत आढळलेले प्राणी बिबट्या , गवा , सांबर , रानडुक्कर , ससा , पिसोरा , भेकर , अस्वल , वानर , सायाळ , मुंगूस , मोर , रानकोंबडी , शेकरू , उदमांजर . अभिप्रायानुसार रात्री पाणवठ्यावर  पाणी पिण्यासाठी ३०८ प्राणी आल्याची नोंद घेण्यात आली आहे . 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बुद्धपौर्णिमेच्या चांदण्यारात्री प्राणी गणना करण्यात आली. चांदोली वनपरिक्षेत्र अंतर्गत करण्यात आलेल्या गणनेत सांगली, सातारा,कोल्हापूर जिल्ह्यातील २५  हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक नानासाहेब लडकत व उपसंचालक उत्तम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा निसर्ग अनुभव उपक्रम राबवण्यात आला. 

वन्यप्राणी गणनेत बिबट्यासह ३०८ श्वापदांची नोंद | 308 animals including leopard recorded in wildlife census

वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप कुभांर, संदीप जोपाळे, नंदकुमार नलवडे, शिशुपाल पवार, बाळकृष्ण हसबनीस आदींनी आप आपल्या वन्यजीव परिक्षेत्रात ही गणना केली. या गणनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. त्यामधून काही ठराविक स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. निवड झालेल्या स्वयंसेवकांना निसर्ग अनुभव कार्यक्रम अंतर्गत  सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री पाणवठ्यावरील वन्य प्राणी प्रत्यक्षात पाहून गणना करता आली.या उपक्रमामुळे वन्यजीव प्रेमी तसेच निसर्गप्रेमीना  व्याघ्रप्रकल्पाच्या जंगलातील मचाणावर  चांदण्या रात्री वन्यजीव पाहता आले.  

उन्हाळ्यामध्ये जंगलातील बहुतांश पाणवठे कोरडे  असतात काही ठराविक पाणवठ्यावरच पाणीसाठा असल्याने वन्य प्राणी  अशा पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी गर्दी करतात. अशा पाणवठ्यावर लाकडी मचान बांधण्यात आले होते. प्रत्येक मचाणावर दोन स्वयंसेवक व एक वन कर्मचारी असे तिघांची नियुक्ती केली. चांदोली वनपरिक्षेच्या अंतर्गत येणाऱ्या निवळे, झोळंबी, सोनार्ली, ढाकळे, चांदेल या परिसरात स्वयंसेवकांना पर्यटनासाठी नुकतीच दाखल झालेल्या नवीन बस मधून नेमून दिलेल्या ठिकाणावर सोडण्यात आले. 

वन्यप्राणी गणनेत बिबट्यासह ३०८ श्वापदांची नोंद | 308 animals including leopard recorded in wildlife census

ढगाळ वातावरण असल्यामुळे काही ठिकाणी स्वयंसेवकांना प्राण्यांचे दर्शन झाले नाही. मात्र काही ठिकाणी प्राण्यांचे प्रत्यक्ष दर्शन आणि त्यांचा आवाज तसेच रात्रीचे जंगलातील विश्व स्वयंसेवकांना अनुभवता आले त्यामुळे सर्वच स्वयंसेवकांनी या गणनेमुळे आम्हाला अविस्मरणीय अनुभव मिळाल्याच्या प्रतिक्रिया दिल्या.

वन्यप्राणी गणनेत बिबट्यासह ३०८ श्वापदांची नोंद | 308 animals including leopard recorded in wildlife census

Post a Comment

0 Comments