BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तिहेरी अपघातात युवक ठार |Youth killed in triple accident

तिहेरी अपघातात युवक ठार |Youth killed in triple accident

तिहेरी अपघातात युवक ठार |Youth killed in triple accident
Feature Slides

shiv news 

तिहेरी अपघातात युवक ठार |Youth killed in triple accident

 भाटशिरगाव ( ता.शिराळा) येथे दोन मोटारसायकल व टँकर या तिहेरी अपघातात एक युवक ठार तर दोन जण जखमी झाले. अवधूत रामदास पाटील ( वय १९ , रा.कणदूर) हा युवक ठार तर सुरज नामदेव पाटील ( वय २९ , रा.कणदूर ) , विराज सुखदेव गोळे(रा.कांदे) हे दोघे जखमी आहेत. सदर अपघात आज सोमवार रोजी सकाळी ११:३० च्या दरम्यान झाला.

तिहेरी अपघातात युवक ठार |Youth killed in triple accident
 
      याबाबत जखमी सुरज पाटील याने शिराळा पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे. पोलिसातून समजलेली माहिती अशी की , सुरज हा आपली मोटारसायकल घेवून सागाव येथे पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी निघाला होता. दरम्यान अवधुत  हा त्याला  भेटला . त्यावेळी  शिराळा येथे काम असल्याने  जावूया म्हणून ते  दोघे  मोटर सायकलवरून शिराळकडे निघाले. भाटशिरगाव जवळ  आले असता अवधुतच्या मोटर सायकलला समोरुन येणाऱ्या मोटारसायकलने जोराची धडक दिली.

तिहेरी अपघातात युवक ठार |Youth killed in triple accident

  त्यावेळी सुरज हा रस्ताचे एका  बाजूस  व अवधूत मोटर सायकलसह रस्ताच्या  दुसऱ्या   बाजुस पडला. त्याचवेळी पाठीमागुन येणाऱ्या टँकरच्या समोर अवधूत आल्याने  त्यास  मोटर सायकलसह टँकरने पुढे फरफटत नेले. त्यात  अवधुतच्या  पायाला व  छातीला मार लागला. त्यास  तातडीने शिराळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता तो  मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

तिहेरी अपघातात युवक ठार |Youth killed in triple accident
 
 दुसरा मोटारसायकल चालक विराज सुखदेव गोळे यास सांगलीला उपचारासाठी  नेले आहे.  सुरज पाटील याच्यावर शिराळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत .घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार भेट दिली. पुढील तपास  हवालदार कालिदास गावडे हे करीत आहेत. 

तिहेरी अपघातात युवक ठार |Youth killed in triple accident
 
एकुल्या एका मुलाच्या जाण्याने आईचा आक्रोश 

अवधूत हा सरूड ता. शाहुवाडी येथे एफ,वाय बी.काम ला होता. त्याच्या पश्चात आई, वडील व लहान बहिण आहे. एकुलत्या एका मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आईच्या उपजिल्हा रुग्णालयात सुरु असणारा आक्रोश ऱ्हादय पिटाळून टाकणारा होता.आई आशा स्वयंसेविका असल्याने रुग्णालयात परिसरातील आशा स्वयंसेविकानी गर्दी केली होती.

तिहेरी अपघातात युवक ठार |Youth killed in triple accident

भारती

-----------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments