शिराळा:शिंदेवाडी गावाला कायम पाणी टंचाईला सामोरे जावे लागले आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल असा विश्वास जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांनी व्यक्त केला.
शिंदेवाडी (ता. शिराळा) येथे नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी देशमुख म्हणाले ,हे गाव कायमस्वरूपी टंचाई मध्ये असल्याने येथील लोकांना पाण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. उन्हाळ्या मध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता.
या वर्षी देखील या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरुपात निर्माण झाला आहे. शासनाकडे गेल्या अनेक दिवसापासून या गावाला नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर व्हावी यासाठी सतत पाठपुरवठा सुरू होता. त्याला यश आले . या योजनेचे काम लवकर पूर्णत्वास आणून या गावाला मुबलक व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी प्रशासनाने काम गतीने पूर्ण करावे.
यावेळी सरपंच मारुती शिदे, भगवान मस्के, अनिल शिंदे, चंद्रकांत शिंदे ,बाळासो साळुंखे, बाजीराव शिंदे, दिलीप शिंदे,भगवान शिंदे, वर्षा शिंदे,मंगल शिंदे, सुनीता शिंदे, सुरेखा शिंदे, संगीता साळुंखे उपस्थित होत्या.
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता कधीच नाही
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments