shiv news
शिराळा : कै.माजी.आमदार वसंतराव नाईक ( बाबा ) स्मृती प्रतिष्ठान ने 1991 पासून सुरू केलेल्या पाणपोईची प्रेरणा इतर सामाजिक संस्थांनी घेऊन ठीक ठिकाणी सुरू केल्यास तहानलेल्यांची तहान भागल्यामुळे समाधान मिळेल असे प्रतिपादन प.पू.स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्थेचे अध्यक्ष अॅड भगतसिंग नाईक यांनी उद्घाटन प्रसंगी केले .
प्रारंभी अॅड भगतसिंग नाईक यांच्या हस्ते बाबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. नाईक पुढे म्हणाले , सध्या उन्हाचा तडाखा दिवसभर जाणवत आहे .गोरक्षनाथांची यात्रा भर उन्हाळ्यात असते . रस्त्यावरून जाणाऱ्या यात्रेकरू मध्ये अबालवृद्ध महिला व वयस्कर व्यक्तीना थंडगार पाणी मिळावे या उद्देशाने सण 1991 पासून कै.माजी.आमदार वसंतराव नाईक ( बाबा ) स्मृती प्रतिष्ठान ने सामाजिक बांधिलकी तुन यात्रेकरूंना थंडगार पाणी मिळावे या हेतूने वसंत पाणपोई सुरू केली असे ही ते म्हणाले.
या वेळी प्रतिष्ठान चे प्रा.एन.डी.मिरजकर, प्रा.शिंदे सर , उपप्राचार्य बी.आर.दशवंत, डॉ.तानाजी हवलदार , एस.एम .पाटील सर , दिपक गायकवाड , दिनेश हसबनिस ,अलताफ काझी , अवधूत गायकवाड , नामदेव पाटील, इत्यादी उपस्थित होते.
सम्राट आमदार होण्याचे नानासाहेबांचे स्वप्न देवेंद्र पूर्ण करतील
--------------------------------------------------------------------------------
तिथला ग्लास मला चालत नाही- देवेंद्र फडणवीस
---------------------------------------------------------------------
0 Comments